कोराडी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूची दरवाढ मागे घेण्याबाबत योग्य उपायोजना कराव्या, अशी मागणी करीत रविवारी कोराडी येथील पटेल पेट्रोल पंप, पांजरा येथे महादुला-कोराडी काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यानंतर कोराडी मार्गावर सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यानंतर केंद्र सरकारला कोराडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत निवेदन आले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश भोयर, कामठी नगर परिषदेचे नगरसेवक काशीनाथ प्रधान, संजय रामटेके, शरद मेश्राम, भूषण ढेंगरे, पूर्वल तकीत, शंकर सोनेकर, राजेश बनसिंगे, आकाश रंगारी, शैलेश गजघाटे, क्रिष्णा भोयर, दयाल शाहु, प्रवीण उगले, विकास लझाडे, अजय बागडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.