लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चक्रासन हे योगासनातील उत्कृष्ट आसन आहे. योगातील याच आसनामध्ये व्यक्ती चालू शकतो. गजानन लडी यांनी या आसनाद्वारे विविध विक्रम केले आहेत. हे आसन जगभरात पोहोचविण्यासाठी चक्रासन रेसचे आयोजन करून त्याचे कॉपीराईट मिळविले आहे, सोबतच देशाला एक नवीन खेळ दिला आहे.गजानन लडी हे चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या छोट्याशा गावातून नोकरीसाठी १९९९ मध्ये नागपुरात आले. त्रिमूर्तिनगरात किरायाने राहत होते. चक्रासनाची आवड असल्याने,जवळच असलेल्या राजीव गांधी उद्यानामध्ये सराव करायचे. या सरावातून त्यांनी चक्रासनावर चालण्याची कसब मिळविले. ते उद्यानात उलटे चालत असल्याने अनेकांना त्यांचे कुतुहल वाटायचे. काही जण हसायचेही. पण गजानन यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता, चक्रासनातून समाजाला काही तरी देण्याची मनीषा बाळगली. त्यासाठी सुरुवातीला चक्रासनाद्वारे विक्रम करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये त्यांनी तेलंगखेडी हनुमान मंदिराच्या ६० पायऱ्या ३ मिनिटात चक्रासनाद्वारे चढल्या. याच वर्षी २२१५ किलो वजनाची टाटा सुमो गाडी १ मिनिटात १०० मीटर चक्रासनाद्वारे ओढत नेली. सोमलवार हायस्कूलच्या ७२ पायºया ९० सेकंदात चढल्या. गायत्रीनगर पाण्याच्या टाकीच्या गोलाकार १३० पायºया ४ मिनिटात चढल्या. गणेश टेकडीचा २६० फुटाचा चढाव २ मिनिटात पूर्ण केला तर ३ डिसेंबर २००५ मध्ये लोकमतच्या ३०० पायºया ८ मिनिटात चक्रासनाद्वारे चढल्या. ते शाब्बास इंडिया शोमध्ये विनर ठरले होते. त्यांना २०१३ मध्ये इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले तर २०१४ मध्ये युनिक वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले.चक्रासनाला त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता, येणाºया भावी पिढीला लाभ मिळावा यासाठी २०१२ पासून चक्रासन रेससाठी प्रयत्न सुरू केले. २०१२ मध्ये चक्रासन स्पोर्टस् असोसिएशनची स्थापना करून, त्याद्वारे पहिली चक्रासन रेस स्पर्धा आयोजित केली. पुढे ही स्पर्धा त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविली. २०१७ मध्ये चक्रासन रेसची पहिली नॅशनल स्पर्धा नागपुरात झाली. यात बिहार येथून स्पर्धक सहभागी झाले होते. चक्रासन रेस ही जगातील वैविध्यपूर्ण रेस असून, त्याचे कॉपीराईट केंद्र सरकारकडून त्यांनी मिळविले आहे. शालेय खेळामध्ये समावेश करावाचक्रासन रेसची व्याप्ती वाढावी म्हणून गजानन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धडे देतात. ग्रामीण भागातून विद्यार्थी तयार करतात. स्पर्धेचे आयोजन करतात. ही रेस राज्य शासनाने शालेय खेळात समाविष्ट करावी म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या रेसचा आॅलिम्पिक खेळामध्ये समावेश करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. चक्रासनाचे फायदे
चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा भिसी गावच्या गजानन लडी यांनी मिळविले चक्रासन रेसचे कॉपीराईट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 6:17 PM
चक्रासन हे योगासनातील उत्कृष्ट आसन आहे. योगातील याच आसनामध्ये व्यक्ती चालू शकतो. गजानन लडी यांनी या आसनाद्वारे विविध विक्रम केले आहेत. हे आसन जगभरात पोहोचविण्यासाठी चक्रासन रेसचे आयोजन करून त्याचे कॉपीराईट मिळविले आहे, सोबतच देशाला एक नवीन खेळ दिला आहे.
ठळक मुद्देचक्रासनात केले विविध विक्रम