लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. कोरोनाची लाट नव्याने आल्याची चर्चा असतानाच वाढती बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. अशातच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका अलर्ट असून, मागील वर्षानंतर या वर्षी प्रथमच शहरातील काही परिसरांमधील इमारतींना प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
शासनाच्या नियमानुसार शहरात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये गोविंदप्रभू नगर, प्लॉट नंबर २५, प्रभाग क्रमांक २९ मधील प्लॉट नंबर ११२, शिवनगर प्रभाग क्रमांक ३१, प्लॉट क्रमांक ११९, अयोध्या नगर नवनाथ शाळेमागे, प्रभाग क्रमांक ३२, प्लॉट क्रमांक २०३, वैदही अपार्टमेंट, जैस्वाल मंगल कार्यालयाच्या बाजूला प्रभाग क्रमांक ३२, प्लॉट क्रमांक ८८, लाडीकर ले-आउट प्रभाग क्रमांक ३२, प्लॉट क्रमांक ९५ लाडीकर ले-आउट, प्रभाग क्रमांक ३२, याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक १७ मधील गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम् टॉवर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी, अत्यावश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, जीवनावश्यक वस्तूंची सेवा, संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी याव्यतिरिक्त कुणालाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश अथवा बाहेर पडण्याची मुभा मिळणार नाही.
-----------------------------------------