शासकीय दंत महाविद्यालयमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:22 PM2020-07-30T23:22:27+5:302020-07-31T00:43:47+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) चार डॉक्टरांसह तीन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी न झाल्याने व सफाई कर्मचाऱ्याचा भाऊ रुग्णालयात फिरून सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Corona infiltration into government dental college | शासकीय दंत महाविद्यालयमध्ये कोरोनाचा शिरकाव

शासकीय दंत महाविद्यालयमध्ये कोरोनाचा शिरकाव

Next
ठळक मुद्देचार डॉक्टरांसह तीन सफाई कर्मचाऱ्यांना बाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) चार डॉक्टरांसह तीन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी न झाल्याने व सफाई कर्मचाऱ्याचा भाऊ रुग्णालयात फिरून सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मुखशल्यचिकित्सा विभागातील एक वरिष्ठ महिला डॉक्टर असून इतर तीन कनिष्ठ डॉक्टर व तीन सफाई कर्मचारी आहेत. संशयित रुग्णांचे नमुने घेणाऱ्या पथकामध्ये हे डॉक्टर होते. १४ दिवसानंतर त्यांची जबाबदारी संपल्याने बुधवारी त्यांनी आपल्या मित्रांसोबत पार्टीही केल्याचे समजते. परंतु पार्टीत असलेल्या इतर डॉक्टरांची गुरुवारी सायंकाळपर्यंत तपासणी झाली नसल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, पॉझिटिव्ह आलेल्या सफाई कर्मचाऱ्याचा भाऊ आज रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. काही विभाग प्रमुखांनाही तो भेटल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Corona infiltration into government dental college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.