शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा; आमच्या मनात किंतू-परंतू नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
2
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
4
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
5
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
6
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
7
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
8
"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा
9
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
10
अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चांवर रविंद्र चव्हाणांनी सोडलं मौन; म्हणाले, "या दोन दिवसांत..."
11
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
12
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
13
'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस
14
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
15
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
16
LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई...
17
आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
18
Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी
19
युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांची मोलकरणींना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रवेश होताच गेल्या मार्च २०२० पासूनच घरोघरी काम करणाऱ्या मोलकरणींना अनेक कुटुंबीयांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रवेश होताच गेल्या मार्च २०२० पासूनच घरोघरी काम करणाऱ्या मोलकरणींना अनेक कुटुंबीयांनी गृहप्रवेश नाकारला होता. टाळेबंदीपर्यंत मोलकरणींना कामावर न येऊ देण्याचा, मात्र पगार पूर्ण देण्याचा तसा आदेशच होता. तेव्हा काही कुटुंबीयांनी या आदेशाचे तंतोतंत पालन केले. याचे पर्यवसान म्हणून, नंतर अनेक कुटुंबीयांनी दोन-तीन महिन्यानंतर मोलकरणींची हकालपट्टीच केली. त्याचा फटका एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर झाला. अनेक मोलकरणींची आर्थिक स्थिती ढासळली. स्थिती पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा कोरोना संक्रमणाचा प्रकोप वाढला आणि स्थिती बिकट बनली. त्यात आता पुन्हा टाळेबंदीची घोषणा या महिलांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. काम नसेल तर पैसा मिळणार नाही आणि पैसा नसेल तर घराचा गाडा हाकायचा कसा, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

--------------

पॉईंटर्स

* २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या

शहर - २३,९८,०००

ग्रामीण - २३,८८,०००

* देशाच्या एकूण जनगणनेनुसार ३५ टक्के नागरिक असंघटित क्षेत्रात

* जिल्ह्यातील ३५ टक्के अर्थात १७ लाख नागरिक असंघटित क्षेत्रात

* त्यात ५० टक्के अर्थात ८.५ लाख महिलांचा समावेश

* २००८ मध्ये जिल्ह्यात मोलकरीण संघटनेकडे एक लाख नोंदी

----------------

मोलकरणींचे प्रकार...

* पूर्णवेळ (एकाच घरी दिवसाचे ८ तास) - पगार १२०० रुपये प्रतितास (महिनेवारी)

* अंशकालिन (एका दिवसाला सात-आठ घरे) - पगार ५०० ते ६०० रुपये (महिनेवारी)

--------------

मोलकरणींच्या कामाचे प्रकार

* साफसफाई करणारी

* धुणी-भांडी करणारी

* स्वयंपाकी

* बागकाम करणारी

* ज्येष्ठ किंवा एकटी वृद्ध महिला असणाऱ्या घरी रात्रीला सोबत म्हणून असणारी

------------------

टाळेबंदीमुळे मोलकरणींच्या व्यथा...

* जाटतरोडी येथून रामदास पेठेतील घरांमध्ये धुणी-भांडी करत असते. याच कामावर घरातील चार-पाच सदस्यांचा गाडा चालतो. रोज पायी जाते आणि सायंकाळी ५ वाजता स्वत:च्या घरी पोहोचते. टाळेबंदी, माझे काम बंद झाले तर जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.

- कांता मडामे, मोलकरीण

* भामटी येथे राहते. तेथून त्रिमूर्तीनगर परिसरातील घरांमध्ये काम करण्यास जाते. टाळेबंदीची भीती दाखवली जात आहे. या काळात काम नसेल तर रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.

- मंजुळा मेश्राम, मोलकरीण

* प्रतापनगर परिसरातील घरांमध्ये कामाला जाते. दररोज सात-आठ घरांमध्ये काम करते आणि कुटुंबाचा गाडा चालविते. टाळेबंदीची भीती सगळीकडून व्यक्त केली जात आहे. घरमालक आमचा विचार करतील, अशी अपेक्षा आहे.

- विजया मेश्राम, मोलकरीण

---------------

काम बंद करू नका, काळजी घ्या

गेल्या वर्षभरापासून अनेक घरांमध्ये मोलकरणींना प्रवेश बंदी आहे. त्यांना काम नसल्याने त्यांची स्थिती ढासळली आहे. नागरिकांनी त्यांची व्यथा समजून घ्यावी. काम बंद करण्यापेक्षा काळजी घ्या, सॅनिटायझरचा, हात धुऊनच प्रवेश, मास्क बंधनकारक करा. मोलकरीण जगवणे ही एक समाजसेवा आहे, हे विसरू नका.

- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी, समाजसेविका

..............