नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 08:43 AM2020-09-14T08:43:17+5:302020-09-14T08:43:41+5:30

रविवारी शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले.

Corona on peak in Nagpur, 2343 positive; 45 deaths | नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू

नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरातील २०४२ तर ग्रामीणमधील २९६ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णसंख्येचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. रविवारी २३४३ नव्या रुग्णांची भर पडली. रोजच्या रुग्णसंख्येतील ही विक्रमी वाढ आहे. यात शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ झाली आहे. आज ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठवड्यातील ८ तारखेला २२०५ तर ११ तारखेला २०६० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आज ७९७३ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३४११ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर ४५६२ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. अ‍ॅन्टिजन चाचणीत ८३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीत १५०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

खासगी लॅबमध्ये ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह
महानगरपालिके ने ५०वर विविध ठिकाणी कोरोनाच्या नि:शुल्क चाचणीची सोय के ली असतानाही अनेक संशयित रुग्ण खासगी लॅबमध्ये जात आहे. आज या लॅबमधून ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, एम्स प्रयोगशाळेमधून १०५, मेडिकलमधून २९९, मेयोमधून ३५०, माफसूमधून ७६, नीरीमधून ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १७६९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९,१४९ वर पोहचली आहे. सध्याच्या स्थितीत ११६६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

मेडिकलमध्ये आतापर्यंत ८०४ तर मेयोमध्ये ६५६ मृत्यू
कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यात मेडिकलमध्ये ८०४, सर्वाधिक मृत्यू झाले. शिवाय, मेयोमध्ये ६५६ तर एम्समध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मृत्यूची संख्या मोठी आहे.

 

Web Title: Corona on peak in Nagpur, 2343 positive; 45 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.