नागपुरात कोरोनाचा पुन्हा धोका; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा राधाकृष्णन बी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 11:08 AM2021-02-12T11:08:11+5:302021-02-12T11:22:48+5:30

Nagpur News कोरोना नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले.

Corona re-threat; Increase contact tracing | नागपुरात कोरोनाचा पुन्हा धोका; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा राधाकृष्णन बी यांचे निर्देश

नागपुरात कोरोनाचा पुन्हा धोका; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा राधाकृष्णन बी यांचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांंना बैठकीत दिले.

सध्या क्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,५०० पर्यंत झाली आहे. दररोज २०० ते ३०० बाधित होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मनपा आयुक्तांनी नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचेही आदेश दिले. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपद्रव शोध पथकाला दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

संपर्कात येणाऱ्यांनी चाचणी करावी

घरातील घरकाम करणाऱ्या महिला, दूध, भाजी विक्रेता, जेवण तयार करणारे, वाॅचमन, दुकानदारांची ज्यांचा कामानिमित्त असंख्य लोकांशी संपर्क येतो अशा सर्वांनी वेळोवेळी कोरोनाची चाचणी करावी, तसेच ज्या नागरिकांची रॅपिड न्टिजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली परंतु त्यांना जर लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी त्याच केंद्रावर करण्यात यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

खासगी रुग्णालयांनी काळजी घ्यावी

खासगी रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची प्रकृती जास्त बिघडली तर त्याला मेयो किंवा मेडिकल रुग्णालयात पाठविले जाते, असे निदर्शनास आले आहे. खासगी रुग्णालयांनी तसे न करता कोरोना रुग्णांची स्वत:च्या रुग्णालयात काळजी करायला पाहिजे आणि त्याच्यावर चांगले उपचार करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

पोलीस आयुक्तांशी चर्चा

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना मास्कचा वापर न करणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे निवेदन केले. मिशन बिगीन अगेन लागू झाल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे कमी केले आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आयुक्तांचे आवाहन

-कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना.

- घराबाहेर पडताना मास्क वापरा, सामाजिक अंतराचे पालन करा,

- वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.

-ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडू देऊ नका.

- कोरोनाचा प्रसार रोखण्याची प्रशासन आणि नागरिकांनी जबाबदारी घ्यावी.

Web Title: Corona re-threat; Increase contact tracing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.