लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसाठी आरोग्य विभागातर्फे शनिवारी लक्ष्मीनगर झोन कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परंतु एकाचवेळी तब्बल ६०० शिक्षकांना प्रक्षिणासाठी बोलावण्यात आल्याने येथे प्रचंड गर्दी झाली. प्रशिक्षणातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.लक्ष्मीनगर झोन कार्यालयात ६०० लोक एकाचवेळी बसू शकतील, असा हॉल नाही. कॉन्फरन्स हॉलमध्ये दाटीने प्रत्येकी १०० अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिक्षकांना लक्ष्मीनगर झोन कार्यालयात शनिवारी सकाळी ८ वाजता यावयाचे असल्याचा मेसेज देण्यात आला. त्यानुसार शिक्षक आले होते. वास्तविक शिक्षकांना वेगवेगळी वेळ देण्याची गरज होती. प्रशिक्षण झोन स्तरावर ठेवले असते तर शिक्षकांची गर्दी झाली नसती. परंतु घाईगडबडीत नियोजन केल्याने आरोग्य विभागाचा गोंधळ उडाला. मधुमेह, हृदयविकार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे. प्रशिक्षणासाठी सरसकट सर्व शिक्षकांना बोलावण्यात आले. वास्तविक खरोखरच मधुमेह, हृदय आजार असलेल्यांना यातून वगळण्याची गरज होती.महापौर जोशी पोहचले झोनमध्येलक्ष्मीनगर झोन कार्यालयात प्रशिक्षणासाठी शिक्षकांची गर्दी झाल्याचे कळतच महापौर संदीप जोशी झोन कार्यालयात पोहचले. सर्व्हे करणे गरजेचा आहे. परंतु शासननिर्देशानुसार प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मधुमेह, हृदय आजार असणाऱ्यांना यातून वगळून इतरांना सर्व्हेची जबाबदारी देण्याचे निर्देश दिले. प्रशिक्षण हॉलमध्ये झालेली गर्दी चुकीची आहे. सोशल डिस्टन्स नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.