CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५१ रुग्ण पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:05 PM2020-07-28T23:05:21+5:302020-07-28T23:06:52+5:30

मागील दोन दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना मंगळवारी यात किंचीत घट आली. १५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४८७ तर मृतांची संख्या ९९ वर पोहचली.

Corona virus in Nagpur: 151 patients tested positive in Nagpur, six died | CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५१ रुग्ण पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५१ रुग्ण पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

Next
ठळक मुद्दे१०२ रुग्ण बरे : शहरात ९४ तर ग्रामीणमध्ये ५७ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील दोन दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना मंगळवारी यात किंचीत घट आली. १५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,४८७ तर मृतांची संख्या ९९ वर पोहचली. विशेष म्हणजे, आज १०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २,६८५ झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५९.८३ टक्के आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च महिन्यात सुरुवात होऊन जून महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या १,५२५ होती. मात्र जुलै महिन्यात याच्या दुप्पट, २,९६२ रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही याच महिन्यात सर्वाधिक वाढली. ७४ मृत्यूची नोंद झाली. मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला आहे. मेडिकलमध्ये आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यात बुलडाणा येथील ८५ वर्षीय पुरुष, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष, नागपूरच्या टेका नाका येथील ७२ वर्षीय पुरुष, संजीवनी सोसायटी कडबी चौक येथील ५४ वर्षीय पुरुष व ७६वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. मेयोमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. कामठी येथील या ६० वर्षीय महिलेला २७ जुलै रोजी भरती केले असताना आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह व सारीचाही आजार होता.

कामठीत २५ रुग्ण बाधित
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कामठीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पुन्हा २५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. रुग्णांची एकूण संख्या ४१८ झाली असून यातील १८२ रुग्ण बरे झाले आहेत.

१,७०६ रुग्ण उपचाराखाली
खासगीमधून चाचणी करण्यासाठी रुग्णांचा ओघ वाढल्याचे दिसून येत आहे. आज या लॅबमधून ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, मेडिकलच्या प्रयोगशाळेत २२, मेयोच्या प्रयोगशाळेत २८, एम्सच्या प्रयोगशाळेत २५, नीरीच्या प्रयोगशाळेत सात, माफसूच्या प्रयोगशाळेत १६ अशा एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ९४ तर ग्रामीणमध्ये ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सध्या मेयोमध्ये २९२, मेडिकलमध्ये २७४, एम्समध्ये ४७, कामठी रुग्णालयात नऊ, खासगीमध्ये ३९, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) २६८, मध्यवर्ती कारागृहातील सीसीसीमध्ये ३९, गोरेगाव सीसीसीमध्ये २३ तर ४८७ रुग्णांची भरती प्रक्रिया सुरू होती. एकूण १,७०६ रुग्ण उपचाराखाली होते.

या वसाहतीत आढळून आले रुग्ण
आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये जरीपटकामधील ३, मेयो २, दिघोरी ३, भगवाननगर २, अंबाझरी २, रामेश्वरी ३, काटोल रोड २, भालदारपुरा २, छत्रपतीनगर १, कडबी चौक १, टेलिफोन एक्सचेंजनगर १, शिर्डीनगर १, इतवारी १, जागृतीनगर १, अशोक चौक बुद्धनगर ३, कोराडी रोड १, सोमवारी क्वॉर्टर १, मोठा ताजबाग २, सक्करदरा १, मनीषनगर १, वर्धमाननगर १, सेमिनरी हिल्स १, रघुजीनगर १, रविनगर १, झिंगाबाई टाकळी १, खलासी लाईन १, मिलिंदनगर खामला १, राणी दुर्गावती चौक २, मानकापूर १, बजेरिया १, खरबी रोड १, सदर १, न्यू बाभुळखेडा १, पोलीस लाईन टाकळी १, मानेवाडा रिंग रोड १, सोमलवाडा १, जुना पारडी २, कमाल चौक ३, छोटा ताजबाग २, अजनी चुनाभट्टी १, गंजीपेठ १, पाचपावली ३, नारी १, राजाबाक्षा कॉलनी १, नंदनवन २, रवींद्रनगर १, वर्धमाननगर १, लकडगंज १, उदयनगर १, धंतोली १, महाल १, गोधनी १, इंदोरा १, प्रेमनगर १, गणेशपेठ ६, अभयनगर १, काँग्रेसनगर १, सिव्हिल लाईन्स १, वाठोडा १, टेका नाका १ असे एकूण ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

दैनिक संशयित : १८१
बाधित रुग्ण : ४४८७
बरे झालेले : २६८५
उपचार घेत असलेले रुग्ण : १५२१
मृत्यू : ९९

Web Title: Corona virus in Nagpur: 151 patients tested positive in Nagpur, six died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.