CoronaVirus in Nagpur : कोरोनाचे संकट अधिक गडद, ५७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 10:02 PM2021-04-05T22:02:46+5:302021-04-05T22:03:49+5:30

Corona virus, Nagpur news कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यात वाढत असून, दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी नागपुरात ३,५१९ रुग्ण व ५७ मृत्यूची नोंद झाली.

Corona virus in Nagpur: Corona crisis worsens, 57 deaths | CoronaVirus in Nagpur : कोरोनाचे संकट अधिक गडद, ५७ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचे संकट अधिक गडद, ५७ मृत्यू

Next
ठळक मुद्दे३,५१९ नव्या रुग्णांची भर : चाचण्यांच्या तुलनेत २९.६७ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

  लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यात वाढत असून, दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी नागपुरात ३,५१९ रुग्ण व ५७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या २,४५,१२५ झाली तर, मृतांची संख्या ५,३८४ वर पोहचली. विशेष म्हणजे, होळीचे दोन दिवस वगळता मागील १५ दिवसात पहिल्यांदाच चाचण्यांची संख्या कमी झाली. ११,८५८ चाचण्या झाल्या. त्यातुलनेत दैनंदिन बाधितांचे प्रमाण २९.६७ टक्के आहे. कोरोनाचा हा कहर असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना व रोज रुग्णसंख्येचे नवे उच्चांक गाठले जात असताना सोमवारी कमी चाचण्या झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात ९,९२१ आरटीपीसीआर तर १,९३७ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. आरटीपीसीआरमधून ३,३७३ तर अँटिजेनमधून १४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज ३,७०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,९८,६११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचा दर ८१.०२ टक्के आहे.

 शहरात २,४०५ तर, ग्रामीणमध्ये १,१०९ रुग्ण पॉझिटिव्ह

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २,४०५ तर ग्रामीणमधील १,१०९ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३३ तर ग्रामीणमधील १९ आहेत. जिल्हाबाहेरील ५ रुग्ण व ५ मृत्यूची भर पडली आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १,९०,७९८ झाली असून ३,३९७ मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणमध्ये ५३,२७० रुग्ण व १,११२ मृत्यू झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ४१,१३० सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३२,०१९ होम आयसोलेशनमध्ये तर ९,१११ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

 मेडिकलमध्ये ६५०, मेयोमध्ये ५३० रुग्ण

मेडिकलने मागील काही दिवसात १०० बेडची संख्या वाढविली. परंतु वाढत्या गंभीर रुग्णसंख्येमुळे तेही अपुरे पडत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत मेडिकलमध्ये कोरोनाचे ६५० रुग्ण भरती होते. याशिवाय १०० वर रुग्णांमध्ये कोरोना संशयित व सारीचे रुग्ण होते. मेयोमध्ये कोविडच्या ६०० पैकी ५३० बेड फुल्ल होते. एम्सचे बेड मागील दोन आठवड्यापासून फुल्ल दाखविले जात आहे.

कोरोनाची सोमवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ११ ८५८

ए. बाधित रुग्ण :२,४५,१२५

सक्रिय रुग्ण : ४१,१३०

बरे झालेले रुग्ण :१,९८,६११

ए. मृत्यू : ५,३८४

Web Title: Corona virus in Nagpur: Corona crisis worsens, 57 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.