लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.सोमवारी १,२२७ नव्या रुग्णांची व ३४ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २९,५५५ तर मृतांची संख्या १,०४५ झाली आहे. आज १,२२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९६४ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १,५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. ऑगस्ट महिन्यात भयावह पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ झाली. यामुळे या महिन्यात रुग्णसंख्या वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जे प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करू शकतील तेच कोरोनाला दूर ठेवू शकतील, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.रॅपिड अॅन्टिजन चाचणीत ६४५ पॉझिटिव्हनागपूर जिल्ह्यात आज १,९३० रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १,८९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात ५८२ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. एम्समध्ये ७८, मेडिकलमध्ये ७४, मेयोमध्ये ५०, माफसूमध्ये ७३, नीरीमध्ये ५१ तर खासगी प्रयोगशाळेतून २५६ पॉझिटिव्ह आले. ९,२६६ रुग्ण उपचाराखाली असून आतापर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०१५, ग्रामीण भागातील २११ तर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे.३१ दिवसांत ९१९ मृत्यूजुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले तर मागील महिन्याच्या ३१ दिवसात ९१९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात दोन मृत्यूची नोंद होती. परंतु त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले. जुने व नियंत्रणात नसलेले आजार, वाढलेले वय व उपचारात झालेला उशीर हे बहुसंख्य रुग्णांमध्ये मृत्यूचे कारण ठरले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ३,८२३बाधित रुग्ण : २९,५५५बरे झालेले : १९,२४४उपचार घेत असलेले रुग्ण : ९,२६६मृत्यू : १,०४५
CoronaVirus in Nagpur : नागपुरात १६ टक्क्यांनी रुग्ण तर १० टक्क्यांनी वाढले मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 12:23 AM
ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.
ठळक मुद्देऑगस्ट महिन्यातील धक्कादायक स्थिती : १,२२७ नव्या रुग्णांची भर : ३४ रुग्णांचे मृत्यू