लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे. ४५६ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ७,७४७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांमध्ये १९ वर्षीय तरुण, तरुणी असून महिलांची संख्या लक्षणीय आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये २६७ शहरातील तर १८९ ग्रामीणमधील आहेत. आॅगस्ट महिन्यात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा भयावह पद्धतीने वाढत आहे. १ तारखेला १३, २ तारखेला १५, ३ तारखेला १८, ४ तारखेला १७, ५ तारखेला १५, ६ तारखेला २५ तर आज ४० वर गेला आहे. या सात दिवसात १४३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नऊ रुग्णांचे बळी गेले. यात कमाल चौक आनंदनगर कॉलनी येथील ६१ वर्षीय महिला, कामठी रोड येथील ६५ वर्षीय महिला, टेलिफोन एक्सचेंज चौक जुनी मंगळवारी येथील ४४ वर्षीय पुरुष, मिरे ले-आऊट नंदनवन येथील ५२ वर्षीय पुरुष, कन्हान पारशिवनी येथील ६३ वर्षीय पुरुष, कोलबास्वामी शांतीनगर येथील ५३ वर्षीय महिला, इतवारी येथील ६८ वर्षीय पुरुष, रामनगर कामठी येथील ४२ वर्षीय महिला व जरीपटका येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. मेडिकलमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यात नाईक तलाव येथील १९ वर्षीय तरुणी, नंदनवन येथील ४८ वर्षीय महिला, चंदननगर येथील १९ वर्षीय तरुण, ६६ वर्षीय महिला, ६८ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना न्युमानिया, उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. रेडिएन्सेन हॉस्पिटलमध्येही तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून उपलब्ध झाली नाही.मेयोमध्ये १३१ मृत्यूकोरोना प्रादुर्भावाच्या या पाच महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यू मेयोमध्ये झाले. १३१ मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर मेडिकलमध्ये ११६, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये चार, रेडिएन्सेन हॉस्पिटलमध्ये आठ, सेव्हनस्टार हॉस्पिटलमध्ये दोन, होप हॉस्पिटलमध्ये सहा व इतर ठिकाणी दोन असे २६९ मृत्यू झाले आहेत. दिलासादायक म्हणजे, आज २५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,३३७ झाली आहे. सध्या ३,१४१ रुग्ण उपचार घेत आहेत.दैनिक संशयित : ४९९बाधित रुग्ण : ७,७४७बरे झालेले : ४,३३७उपचार घेत असलेले रुग्ण : ३,१४१मृत्यू : २६९
CoronaVirus in Nagpur : बापरे! ४० मृत्यू : आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:47 PM
कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे.
ठळक मुद्दे४५६ पॉझिटिव्ह : मृतांमध्ये १९वर्षीय तरुण, तरुणी : शहरात २६७ तर ग्रामीणमध्ये १८९ पॉझिटिव्ह