CoronaVirus in Nagpur : चाचण्या घटताच रुग्णसंख्येतही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:52 PM2021-05-27T22:52:42+5:302021-05-27T22:57:16+5:30
CoronaVirus कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ८ हजारांवरून ५०० वर आली आहे; परंतु चाचण्या घटताच रुग्णसंख्येतही घट दिसून येत आहे. बुधवारी १२,९९१ चाचण्या झाल्या. यात शहरातील २६४ रुग्ण व ग्रामीणमध्ये २०८ रुग्णांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४७६ वर पोहोचली. विशेष म्हणजे, १७ मार्चनंतर पहिल्यांदाच मृत्युसंख्या २०च्या खाली आली. गुरुवारी जिल्ह्यात १६ रुग्णांचे जीव गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ८ हजारांवरून ५०० वर आली आहे; परंतु चाचण्या घटताच रुग्णसंख्येतही घट दिसून येत आहे. बुधवारी १२,९९१ चाचण्या झाल्या. यात शहरातील २६४ रुग्ण व ग्रामीणमध्ये २०८ रुग्णांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४७६ वर पोहोचली. विशेष म्हणजे, १७ मार्चनंतर पहिल्यांदाच मृत्युसंख्या २०च्या खाली आली. गुरुवारी जिल्ह्यात १६ रुग्णांचे जीव गेले.
कोरोनाचा पहिल्या लाटेत, मार्च ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यांच्या दरम्यान १,२३,७६७ रुग्ण आढळून आले होते; तर ३९३० रुग्णांचे बळी गेले. दुसऱ्या लाटेत, जानेवारी ते २६ मे २०२१ या ५ महिन्यांच्या कालावधीतच ३,४९, ४०५ नवे रुग्ण व ४९२४ मृत्यूंची नोंद झाली. यामुळे तिसऱ्या लाटेची चिंता अधिक व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तज्ज्ञांतर्फे केले जात आहे. शहरात गुरुवारी १०,८८३ चाचण्या झाल्या. त्या तुनलेत २.४२ टक्के रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले; तर ग्रामीणमध्ये केवळ २,१०८ चाचण्यांमधून ९.८६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांना उपचाराखाली आणणे अधिक गरजेचे आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर
कोरोना दहशतीच्या दुसऱ्या लाटेत दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचे वाढते प्रमाण. गुरुवारी रुग्णांच्या तुलनेत अधिक, ११५१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,५५,२४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे हे प्रमाण ९६.२१ टक्के झाले आहे. कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ९,०७२ वर पोहोचली आहे.
मृत्युदर १.८७ टक्के
शहरात आज ८, ग्रामीणमध्ये ४ तर जिल्ह्याबाहेर ४ असे एकूण १६ रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मृत्युदर २ टक्क्यांवर गेला होता. आता तो कमी होऊन १.८७ टक्के झाला आहे. शहरात हाच दर १.५८ टक्के, तर ग्रामीणमध्ये १.६१ टक्के आहे.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १२,९९१
शहर : २६४ रुग्ण व ८ मृत्यू
ग्रामीण : २०८ रुग्ण व ४ मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,७३,१७२
ए. सक्रिय रुग्ण : ९०७२
ए. बरे झालेले रुग्ण : ४,५५,२४६
ए. मृत्यू : ८,८५४