CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:06 PM2020-07-27T23:06:47+5:302020-07-27T23:08:04+5:30

शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये आज ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

CoronaVirus in Nagpur: Shocking! 274 positives, 10 deaths in Nagpur | CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू

Next
ठळक मुद्दे नागपुरात ११९ तर ग्रामीणमध्ये १५५ बाधित : ४८ तासात ४९९ रुग्ण, १६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये आज ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
नागपुरात दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाल्याने याचा प्रभाव रुग्णसंख्येवर होण्याची चर्चा सुरू असताना, रुग्णसंख्येसोबतच मृतांची सर्वाधिक नोंद झाली. मेडिकलमध्ये पहिल्यांदाच सहा रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली. यात बैद्यनाथ चौक येथील पुरुषाला २४ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती करून उपचार सुरू असताना आज सायंकाळी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आग्यारामदेवी परिसरातील ६३ वर्षीय रुग्णाचा आहे. हा रुग्ण २१ जुलैपासून मेडिकलमध्ये उपचारासाठी होता. तिसरा मृत्यू मोठा ताजबाग येथील ५७ वर्षीय महिलेचा झाला आहे. ही महिला २४ जुलैपासून मेडिकलमध्ये उपचाराला होती. चौथा मृत्य महादुला येथील ४५ वर्षीय पुरुषाचा आहे. हा रुग्णही २४ जुलैपासून मेडिकलमध्ये भरती होता. पाचवा मृत्यू अनमोलनगर येथील ६३ वर्षीय पुरुषाचा आहे. सहावा मृत्यू कमाल चौक परिसरातील पुरुषाचा आहे. १७ जुलैपासून या रुग्णावर उपचार सुरू होते. याशिवाय मेयोमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात लष्करीबाग येथील ४३ वर्षीय महिला, डिगडोह हिंगणा येथील ५० वर्षीय पुरुष, पेन्शननगर येथील ७४ वर्षीय पुरुष व नाईक रोड महाल येथील ६९ वर्षीय पुरुष आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना न्यूमोनिया, उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले आहे.

खासगी लॅबमधून ११३ रुग्ण पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ११९ रुग्ण शहरातील असून, १५५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये प्रथमच ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून ४३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ३१, एम्सच्या प्रयोगशाळेतून ६५, नीरीच्या प्रयोगशाळेतून ९, माफसूच्या प्रयोगशाळेतून १०, अ‍ॅन्टिजन चाचणीतून ३ असे एकूण २७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची संख्या २,५८३ झाली आहे. सध्या १६६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

या वसाहतीत आढळून आले रुग्ण
आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये काँग्रेसनगरमधील १०, छावणी १, पारडी ७, कोराडी रोड ५, हुडकेश्वर रोड २, बंगाली पंजा इतवारी ८, लक्ष्मीनगर ५, जाफरनगर १०, बेलतरोडी २, झिंगाबाई टाकळी १, डिप्टीसिग्नल कुंभारपुरा २, क्रिष्णानगर नारा रोड ६, राधे ले-आऊट बालाजीनगर १, गोरेवाडा रोड २, अंबाझरी हिलटॉप १, गणपतीनगर गोधनी रोड ५, नारी रोड ३, कुंदनलाल गुप्तानगर १, रजत संकुल गणेशपेठ २, तकीया मोमीनपुरा २, क्रिष्णानगर वाठोडा २, टेकानाका ४, जयप्रकाशनगर खामला १, कळमना रोड १, सतरंजीपुरा ३२, मरियमनगर ३, सिव्हिल लाईन्स १, शांतिनगर १, त्रिमूर्तीनगर १, भांडेवाडी १, खरबी ३, पंजाबी लाईन गड्डीगोदाम १, तांडापेठ १, चंद्रनगर १, टेलिकॉमनगर १, कपिलनगर ३, राणी दुर्गावती चौक १३, वैशालीनगर २, वायुसेना १, जुना बगडगंज १, पंचशीलनगर १, कामगार कॉलनी सुभाषनगर १, शंभूनगर १, टिळकनगर १, स्वावलंबीनगर १, फ्रीडम फायटर कॉलनी १, भुतेश्वरनगर महाल २, सुरेंद्रगड सेमिनरी हिल्स १, शांतिनगर १, गांधीबाग १, गांधीनगर १, प्रशांतनगर १, श्रीनगर १, कुकरेजा निवास जरीपटका २, मानेवाडा १, पार्वतीनगर २, नंदनवन १, अजनी १, इंदोरा चौक १, यादवनगर १, संत्रा मार्केट १, न्यू सुभेदार ले-आऊट १, ओमकारनगर १ असे एकूण १७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

दैनिक संशयित : ४३०
बाधित रुग्ण : ४,३३६
बरे झालेले : २,५८३
उपचार घेत असलेले रुग्ण : १६६५
मृत्यू : ९३

Web Title: CoronaVirus in Nagpur: Shocking! 274 positives, 10 deaths in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.