कोरोना नियंत्रणावर मनपाचा ३८. १७ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:08+5:302021-06-28T04:07:08+5:30

मनपा सभागृहात होणार चर्चा : एसडीआरएफ व एनयूएचएम अंतर्गत ३५.६७ कोटीचा निधी प्राप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Corporation on Corona Control 38. 17 crore | कोरोना नियंत्रणावर मनपाचा ३८. १७ कोटींचा खर्च

कोरोना नियंत्रणावर मनपाचा ३८. १७ कोटींचा खर्च

Next

मनपा सभागृहात होणार चर्चा : एसडीआरएफ व एनयूएचएम अंतर्गत ३५.६७ कोटीचा निधी प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटामुळे महापालिकेचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे. कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनावर ३८ कोटी १७ लाख ७ हजार ५३६ रुपये खर्च करण्यात आले. आरोग्य सुविधा, वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामुग्री, औषधे, इंजेक्शन, टेस्टींग, लसीकरण, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर आदी बाबींवर हा खर्च करण्यात आला.

एसडीआयएफ अंतर्गत मनपाला २०२०- २१ या वर्षात ९ कोटी ७८ लाख तर २०२१- २२ या वर्षात १२ कोटी ५ लाख ३२ हजार ८०३ रुपयांचा निधी प्राप्त झाला. एनयूएचएम आरोग्य विभागांतर्गत १३ कोटी ६३ लाख ८३ हजार १०२ रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. तसेच मनपाने दोन वर्षात २ कोटी ६९ लाख ९१ हजार ६३० कोटींचा खर्च आपल्या तिजोरीतून केला आहे. कोरोना संकटामुळे मनपावर आर्थिक भार वाढला तर दुसरीकडे उत्पन्नावर परिणाम झाला. परिणामी शहरातील विकास कामांना याचा फटका बसला. गेल्या दीड वर्षात शहरातील विकास कामे जवळपास ठप्प आहेत.

शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये संसर्ग अधिक पसरला. मनपा प्रशासनाने इतर खर्च वगळून आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाची दुसरी लाट ही यावर्षी मार्च पासून सुरू झाली. एप्रिल महिन्यात शहरात प्रचंड वेगाने संसर्ग पसरला. महिनाभरात शहरात पहिल्या लाटेत निर्माण केलेल्या आरोग्य सुविधाही कमी पडल्या. त्यामुळे प्रशासनाला आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण कराव्या लागल्या. तसेच या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. त्यात कोरोना लसीकरण जानेवारीपासून सुरू झाल्याने यासाठी खर्च वाढत गेला. बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत यावर वादळी चर्चा होणार आहे.

......

एसडीआरएफ मधून झालेला खर्च

वैद्यकीय उपकरण यंत्र सामुग्री -१,०१,१७,४६८

चाचणी यंत्र -४१,७३, ९०९

ऑक्सिजन सिलेंडर फ्लो मीटर मेडिकल ऑक्सिजन, प्लांट -१,६१,२९,०१६

आरटीपीसीआर टेस्ट -९२,०५,६१८

रॅपिड अ‍ॅन्टीजेन किट -३,७७,१७,९९८

सॅनिटायजर, मास्क, ग्लोज -५६,३७,८४०

संगणक, साहित्य - १,०१,७६,४२३

औषधी व इंजेक्शन -१,४३,२५,७६५

सर्जिकल आयटम -२२,२१,१३०

थर्मामीटर गन -२७,७८,१००

ऑक्सीमीटर -८,७३,६८०

बेड व साहित्य -७२,९०,८५९

कार्यालय साहित्य -६३,६७,२७९

ऑक्सिजन पाईप लाईन -१,३३,५३,६४५

जेवण, नास्ता व इतर -३,६१,६५,३६५

बेघर नागरिकांची व्यवस्था -१,२४,२८,८६६

बायो मेडिकल वेस्ट -१,१०,११,८००

डस्टबीन,बीएमव्ही बॅग -३६,०७, ७४३

अ‍ॅम्ब्युलन्स -५२,११,७४६

....

एनयूएचएम मधून झालेला खर्च

रॅपिड अ‍ॅन्टीजेन किट -२२६८०००

कोविड आयईसी जाहीरात -२४२६९७

व्हीटीएम किट -१५३०८००

पीपीपी किट -५७४८७५०

शोज कव्हर -२१९४८०

एन ९५ मास्क -१२९९९५०

सॅनिटायजर -६९७९९४

फेस मास्क -७८९६००

प्रिटींग फॉरमेट -२८००००

प्रिटींग स्टॅम्प -२०५०००

व्हीटॅमिन बी कॉम्प्लेक्स -२५००००

व्हीटॅमिन सी-५२१९९९

पॅरासिटॅमल -२१००००

कोविड स्टाफ -११२२७६२०६

झोन स्तरावरील वाहने व अन्य -११६३५६९

कोविड एनयूएचएम स्टाफ -२७२४०००

कोविड आशा इन्सेटीव्ह -४८११०००

Web Title: Corporation on Corona Control 38. 17 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.