मनपाची ८१२ कोटीची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:52+5:302020-12-16T04:25:52+5:30
मालमत्ता कर ६०० कोटी तर पाणी कर २१२ कोटी थकीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची मालमत्ता कराची ...
मालमत्ता कर ६०० कोटी तर पाणी कर २१२ कोटी थकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची मालमत्ता कराची थकबाकी ६०० कोटी असून २१२.६७ कोटीची पाणीपट्टी थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने शास्ती माफीची योजना आणली आहे.
मालमत्ता करासाठी शास्ती माफीची योजना १५ डिसेंबर २०२० ते १४ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान तर पाणीपट्टी शासकीय माफीची योजना २१ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ या दरम्यान राबवली जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विजय झलके व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मालमत्ता कराची चालू वर्षाची मागणी २५० कोटी व थकबाकी ६०० कोटी अशाप्रकारे ८५० कोटी मालमत्ता कराचे येणे आहे. पाणीपट्टीची २.५७ लाख ग्राहकांकडे २१२.६७ कोटी थकीत आहे. त्यापैकी ९८.५१ कोटी मुद्दलाची रक्कम असून ११४.१६ कोटी एवढी शास्तीची रक्कम आहे.