लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोन्याच्या दराने पुन्हा ३२ हजाराचा आकडा पार केला आहे. सोन्याच्या भावात काही महिन्यातच हजार रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा दर ३२ हजार १० रुपये इतका झाला आहे. चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात १० टक्क्यांची वाढ केल्याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. पण आयात शुल्क वाढवल्यानंतरही सोन्याची मागणी वाढतच आहे.ग्राहकांना सोन्याचे आकर्षणग्राहकांना सोन्याच्या वाढणाऱ्या किमतीचे आकर्षण आहे. सततच्या भाववाढीमुळे अजून सोने घ्यावे, अशी मानसिकता सामान्य ग्राहकांची झाली आहे. सणासुदीत भाववाढीच्या शक्यतेने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. शनिवारी १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ३२,०१० रुपये होता. येत्या काळात ग्राहकांचा ओघ असाच राहील का हे सांगता येणे कठीण आहे. मात्र सोन्याचे भाव आणखी वाढतील, या शक्यतेने ग्राहकांनी खरेदी वाढविल्याचे रोकडे यांनी सांगितले.चांदीच्या वस्तूंना मागणीशनिवारी चांदीचे भाव किलोमागे १३५ रुपयांनी कमी होऊन ३९,७६५ रुपयांवर स्थिरावले. सोन्याच्या तुलनेत चांदीचे भाव स्थिर असल्यामुळे ग्राहक दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्यासोबतच चांदीच्या वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहेत. यावर्षी चांदीला ग्राहकांचा कधी नव्हे एवढा प्रतिसाद आहे.आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्नउत्सवांचा सिझन सुरू झाला असून लग्नसराईचा काळ सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या डिसेंबरमध्ये होणाºया डिलिव्हरीसाठी झालेल्या फ्युचर ट्रेडींगचेही भाव वधारले आहेत. जागतिक बाजारातही सोन्याच्या दर अर्ध्या टक्क्याने वाढला आहे. व्यापार तूट, चलन दरातील घट यांच्यामुळे सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.कमकुवत रुपयाचा फटकाभारतातील सोन्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे ८०० टन सोने आयात करावे लागते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले तर सोन्याची आयात महाग होते. काही एका महिन्यातच रुपयांचे मूल्य ७४ पैशाच्या पातळीवर गेले आहे. ‘मेक इन इंडिया’चे यश निर्यातीवर अवलंबून असल्याने केंद्र सरकार रुपया सध्याच्या पातळीपेक्षा बलवान होणार नाही, याकडे कटाक्षाने पाहात असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. त्यामुळे कुठलीही आयात स्वस्त होण्याची शक्यता नसल्याने सोने आयातही महागच असेल. त्याचाही परिणाम सोन्याच्या देशांतर्गंत दरांवर कायम राहणार असल्याचे रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी स्पष्ट केले.