बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:58 PM2017-12-17T22:58:02+5:302017-12-17T23:13:59+5:30

बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडूनदेखील मदतीचा हात देणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.

Cotton bud larva affected farmers will get help from Central Government | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री, गडकरी, केंद्रीय कृषिमंत्र्यांची बैठकशरद पवारांचा घेतला सल्लाप्रस्तावाला सहकार्य करण्याचे कृषिमंत्र्यांचे आश्वासन

ऑनलाईन लोकमत
नागपूर : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडूनदेखील मदतीचा हात देणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावाला सहकार्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
‘बीटी’चे ‘लायसन्स’ देण्यात येत असताना पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा कंपन्यांनी केला होता. त्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. विमा काढलेल्यांनादेखील नुकसानभरपाई मिळेल; सोबतच ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्राकडूनदेखील मदत घेण्यात येईल. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर स्पष्ट केले होते.
रविवारी केंद्रीय कृषिमंत्री नागपुरात आले असताना सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही यावेळी राधामोहन सिंह यांनी दिली.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. रामदास तडस, खा. कृपाल तुमाने, खा. संजयकाका पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ.ए.के. सिंग, अतिरिक्त महासंचालक पी. के. चक्रवर्ती, महिकोचे राजेश बारवाले, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. मायी, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ.व्ही.एन.वाघमारे, माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर, पणन विभागाचे उपसचिव के.जी. वळवी, कृषी संचालक एम.एस.घोलप, एस.एल.जाधव, क्रॉपकेअर फेडरेशनचे अध्यक्ष राजूभाई श्रॉफ, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी क्षेत्राचे संशोधक या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.

Web Title: Cotton bud larva affected farmers will get help from Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.