लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे २९ नोव्हेंबरला सकाळी १० सायंकाळी ५ दरम्यान संस्थेच्या परिसरात कापूस मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मेळाव्याचे उद्घाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्लीचे महासंचालक डॉ. एस. के. चौधरी, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षणचे संचालक डॉ. पी. चंद्रन, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरो उपस्थित राहतील. मेळाव्यात विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान, रोगांचे व्यवस्थापन आदींची माहिती देण्यात येईल. पत्रकार परिषदेला डॉ. एस. एम. वासनिक, डॉ. ग्लेस डिसुजा उपस्थित होते.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे नागपुरात कापूस मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:06 AM