नागरिकांची गर्दी, काेराेनाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:50+5:302021-02-23T04:11:50+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण बऱ्यापैकी कमी झाले हाेते. त्यामुळे बहुतांश ...

Crowds of citizens, inviting Kareena | नागरिकांची गर्दी, काेराेनाला निमंत्रण

नागरिकांची गर्दी, काेराेनाला निमंत्रण

Next

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेक शहरासह ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण बऱ्यापैकी कमी झाले हाेते. त्यामुळे बहुतांश नागरिक यापूर्वी काहीही घडले नाही, अशा आविर्भावात वावरत होते. आठवडी बाजारासह बाजारपेठेत, तसेच लग्नसमारंभात गर्दी करणे, मास्क न वापरणे यासह अन्य प्रतिबंधात्मक उपाययाेजनांना तिलांजली देण्यात आली. त्यातच काेराेनाने नागपूर जिल्ह्यात पुन्हा उचल घेतली. नागरिकांची ही गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडणारी ठरत असून, याला प्रशासनाची उदासीनता व हतबलता कारणीभूत असल्याचा आराेप काही जाणकार व सुूज्ञ नागरिकांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी रामटेक शहरासह तालुक्यातील काही गावे हाॅटस्पाॅट बनली हाेती. दिवाळीनंतर काेराेना संक्रमण कमी व्हायला सुरुवात झाली आणि शासनाने टाळेबंदी शिथिल केली. नागरिकांना काही प्रमाणात मुभा मिळाल्याने अनेकांनी पूर्वीप्रमाणेच वागायला व वावरायला सुरुवात केली. बाजारपेठ, आठवडी बाजारात गर्दी करणे, मास्क न वापरता घराबाहेर पडणे या मूलभूत उपाययाेजनांचाही अनेकांना विसर पडला. मग फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे दूरच राहिले.

दुसरीकडे, काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ही कारवाई जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये केली जाणार असल्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले. यासाठी पथकांची निर्मिती करून माेहीम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रामटेक शहरात रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात कुणीही प्रतिबंधात्मक उपाययाेजनांवर अंमल केला नसल्याचे दिसून आले. ही बाब प्रशासनाच्याही निदर्शनास आली. मात्र, कुणीही कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही.

...

तीन नवीन रुग्णांची नाेंद

रामटेक तालुक्यात रविवारी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काेराेनाच्या तीन नवीन रुग्णांनी नाेंद करण्यात आली. यापूर्वीच्या २६ रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यात तिघांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील काेराेना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या १,०६२ झाली असून, यातील ९४८ रुग्णांनी काेराेनावर समर्थपणे मात केली. यात रामटेक शहरातील ३६२ रुग्णांपैकी ३३७ रुग्णांचा समावेश आहे.

...

लग्नसमारंभ धूमधडाक्यात

टाळेबंदी शिथिल हाेताच लग्नसमारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली. वरात काढणे, बँडबाजा किंवा डीजे वाजविणे, वरात किंवा मिरवणुकीत मास्क न वापरता सहभागी हाेणे, बसमध्ये विना मास्क प्रवास करणे, शिकवणी वर्गात गर्दी करणे यासह अन्य बाबी निदर्शनास आल्या. बसवर मास्क नाही तर प्रवेश नाही असे लिहिलेले असतानाही नागरिकांना बसमध्ये विना मास्क प्रवेश दिला जात आहे. हीच अवस्था हाॅटेल व इतर दुकानांचीही आहे.

Web Title: Crowds of citizens, inviting Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.