लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : नागपूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागपूरहून उमरेडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दाेन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना उमरेड वेकाेलि गजानन महाराज टेकडी परिसरातील वळणावर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
दत्तू ईश्वर इरपाते (२२) व अस्मित अजय सिरसान (१९) दाेन्ही रा. चांपा, ता. उमरेड, अशी जखमींची नावे आहेत. दत्तू व अस्मित हे दाेघेही एमएच-४०/बीएच-२६३६ क्रमांकाच्या दुचाकीने उमरेड येथून नागपूरकडे जात हाेते. अशातच गजानन महाराज टेकडी परिसरातील वळणावर समाेरून भरधाव येणाऱ्या एमएच-४०/एसी-९७६५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुण गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने तेथून पळ काढला हाेता. दरम्यान, काही वेळेतच शाेध घेत पाेलीस उपनिरीक्षक राजू डोर्लीकर, अनिल वाढीवे, रमेश त्रिपाठी यांनी मोठ्या शिताफीने आराेपी कारचालकास मकरधोकडा येथे अटक केली. अपघात हाेताच प्रहार संघटनेचे संदीप कांबळे, नंदू कांबळे, राकेश गणवीर, प्रकाश भोयर आदींनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दाेघांनाही नागपूरला रवाना करण्यात आले.
याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३३७, ३३८, २६९, सहकलम १८४, १३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी कारचालकास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.