आॅनलाईन लोकमतनागपूर :
विजय दर्डा यांच्या प्रश्नाने वाढली रंगतलोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या एका प्रश्नाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी हे क्षेत्र महिलांचे असताना त्यात पुरुष पुढे कसे? अशी विचारणा केली. त्यावर रतनानी यांनी विनोदी उत्तर दिले. कोणत्याही पुरुषाला त्याची पत्नी दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात तासन्तास राबावी, हे सहन होणार नाही. त्यामुळे पुरुषांनीच या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला.
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्यांच्या स्वादिष्ट पदार्थांचे ‘डेमॉस्ट्रेशन’; मास्टर शेफ विक्की रतनानींनी दिल्या टीप्सयवतमाळ हाऊस येथे दिलखुलास दिली प्रश्नांना उत्तरेआॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील सेलेब्रेटी मास्टर शेफ विक्की रतनानी यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची शोभा वाढवली. त्यांनी नागपुरात येऊन येथील महिलांना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे, याच्या महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या. हा कार्यक्रम रहाटे कॉलनीतील यवतमाळ हाऊस येथे झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रतनानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, उपसरव्यवस्थापक आशिष जैन, अध्यक्ष (विक्री) करुण गेरा आदी उपस्थित होते. रतनानी यांचे देशभरात नाव आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी पाककलेची आवड असणाºया महिलांनी गमावली नाही. रतनानी यांच्याकडून संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ तयार करण्याच्या टीप्स घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. रतनानी यांनी नागपूर आॅरेंज अॅन्ड सोय ग्लेझ्ड कॉटेज व आॅरेंज सिटी विन्टर रिसोट्टो हे दोन पदार्थ तयार करून दाखवले. दोन्ही पदार्थांमध्ये संत्र्यांचा उपयोग करण्यात आला. अनेक महिलांनी त्या पदार्थांची चव चाखून रतनानी यांची प्रशंसा केली. दरम्यान, महिलांनी रतनानी यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले, तसेच नेहमी अडचणीच्या ठरणाºया काही गोष्टींवर उपाय विचारून घेतले. रतनानी यांनी सर्वांना दिलखुलास उत्तरे दिली. ज्येष्ठ नागरिक तारादेवी चोरडिया यांच्यासह अपर्णा चौधरी यांनी स्वत: तयार केलेले पदार्थ रतनानी यांना भेट दिले. रतनानी यांनी त्यांच्या पदार्थांचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर रतनानी यांनी महिलांसोबत सेल्फी काढून घेतली, तसेच अनेक महिलांनीही स्वतंत्रपणे रतनानी यांच्यासोबत सेल्फीज काढून घेतल्या. सविता संचेती यांनी प्रास्ताविक केले. पूनम कुकरेजा यांनी संचालन केले. अर्चना झवेरी व शालिनी गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.विजय दर्डा यांच्या प्रश्नाने वाढली रंगतलोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या एका प्रश्नाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी हे क्षेत्र महिलांचे असताना त्यात पुरुष पुढे कसे? अशी विचारणा केली. त्यावर रतनानी यांनी विनोदी उत्तर दिले. कोणत्याही पुरुषाला त्याची पत्नी दुसºयाच्या स्वयंपाकघरात तासन्तास राबावी, हे सहन होणार नाही. त्यामुळे पुरुषांनीच या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला.