दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच :गेट बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 07:47 PM2020-10-24T19:47:19+5:302020-10-25T00:10:50+5:30

Dhamma Chakra Pravartan Din Simply, Deekshabhoomi, Nagpur News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर २५ ऑक्टोबर रोजी होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच साजरा होईल, यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी दीक्षाभूमीचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत.

Dhamma Chakra Pravartan Din on Deekshabhoomi Simply: The gate will remain closed | दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच :गेट बंद राहणार

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच :गेट बंद राहणार

googlenewsNext
ठळक मुद्दे कुणालाही प्रवेश नाही : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर २५ ऑक्टोबर रोजी होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानेच साजरा होईल, यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी दीक्षाभूमीचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत.

१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी दिनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून या वर्षीदेखील उद्या २५ ऑक्टोबर रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि स्मारक समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ८.३० वााजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भीमवंदना व बुद्धवंदना होईल. ९.३० वाजता भिक्खुसंघाद्वारे बुद्ध गाथांचे पठण केले जाईल.

दीक्षाभूमी नागपूर यू-ट्यूबवर लाईव्ह

दीक्षाभूमीवर होणारा सोहळा हा साधा असेल. कुठलीही गर्दी होणार नाही. नागिरकांना हा कार्यक्रम दीक्षाभूमी नागपूर यू-ट्यूब चॅनल, आवाज इंडिया व यूसीए बुद्धा यावर लाईव्ह पाहता येईल.

रविवारी सकाळी ९ वाजता सर्वांनी आपापल्या बुद्धविहारात बुद्धवंदना घ्यावी

यावेळी दीक्षाभूमीवर कुणीही गर्दी करू नये. अशोक विजयादशमी दिनी रविवारी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर बुद्धवंदना होईल. त्याचवेळी सर्व नागरिकांनी आपापल्या घरी किंवा बुद्धविहारात बुद्धवंदना घ्यावी, असे आवाहन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डाॅ. सुधीर फुलझेले यांनी केले आहे.

कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली, स्तूपावर रोषणाई नाही

कोरोनाच्या लढ्यात अनेक नागरिक, डाॅक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. या कोरोना योद्धाना श्रद्धांजलीप्रीत्यर्थ व त्यांच्या कुटुंबाांच्या दु:खात सामील होण्याच्या भावनेतून दीक्षाभूमीच्या स्तूपावर यावर्षी रोषणाई न करण्याचा निर्णयसुद्धा स्मारक समितीने घेतला आहे. परंतु मध्यवर्ती स्तूप अंधारात राहणार नाही, याची काळजीसुद्धा घेण्यात आली आहे.

Web Title: Dhamma Chakra Pravartan Din on Deekshabhoomi Simply: The gate will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.