लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोजन केले आहे. दीक्षाभूमीला जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचे ११ अधिकारी आणि १९४ कर्मचारी दीक्षाभूमी परिसराचा स्वतंत्र वाहतूक बंदोबस्त सांभाळणार आहेत. पोलीस उपायुुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना आज ही माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर उपस्थित होते.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून लाखोंच्या संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यंदाही ते येतील. त्यामुळे १७, १८ आणि १९ आॅक्टोबर या तीन दिवसात मुख्य रेल्वेस्थानक तसेच अजनी रेल्वेस्थानक सीताबर्डी, धंतोली आणि गणेशपेठ बसस्थानकापासून दीक्षाभूमीपर्यंतच्या मार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष व्यवस्था केली आहे.वाहतूक शाखेचे पोलीस नियमितपणे शहरातील विविध भागात बंदोबस्त करतीलच. मात्र, दीक्षाभूमीच्या आसपासच्या परिसरात ११ पोलीस अधिकारी आणि १९४ पोलीस कर्मचारी स्वतंत्रपणे बंदोबस्त सांभाळणार आहेत. त्यासाठी १० पॉर्इंट निश्चित करण्यात आले असून, एक मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन या मार्गावर सतत गस्त करेल. सर्व अधिकाऱ्यांकडे मेगाफोन उपलब्ध असेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३६०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३६ पीएस सिस्टीमही कार्यान्वित राहील. दीक्षाभूमी परिसरात पोलिसांची स्वतंत्र कंट्रोल रूम राहील. तेथून सर्व बंदोबस्त नियंत्रित केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे या दिवसांमध्येही वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे उपायुक्त रोशन यांनी पत्रकारांना सांगितले.ड्रोनचीही घेणार मदतएवढ्या प्रचंड संख्येत होणारी गर्दी लक्षात घेता कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पुरती खबरदारी घेतली आहे. गर्दीत कुणी उपद्रव करू नये म्हणून ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. मेगा फोन आणि ड्रोन हे यावर्षीच्या बंदोबस्तात पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. पोलीस हे नागरिकांच्या सुविधेसाठी नियोजन करीत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त रोशन यांनी केले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 1:01 AM
लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोजन केले आहे. दीक्षाभूमीला जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचे ११ अधिकारी आणि १९४ कर्मचारी दीक्षाभूमी परिसराचा स्वतंत्र वाहतूक बंदोबस्त सांभाळणार आहेत. पोलीस उपायुुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना आज ही माहिती दिली.
ठळक मुद्दे११ अधिकारी, १९४ कर्मचारी तैनात : दीक्षाभूमीला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन