लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. वनस्पतीशास्त्रात ‘डाटाबेस’ला असाधारण महत्त्व आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यामुळे ‘डिजिटल डेटाबेस’ ही काळाची गरज असून याचा फायदा विद्यार्थी व विद्यापीठांनादेखील निश्चितच मिळेल, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.टी.श्रीनिवासु यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ.अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.‘इलेक्ट्रॉनिक हर्बेरिअम अॅन्ड डिजिटल बायोडायव्हर्सिटी डाटाबेस आॅफ नागपूर’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘नीरी’च्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.साधना रायलु, मुख्य वैज्ञानिक डॉ.ए.एन.वैद्य व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. ‘डिजिटल हर्बेरिअम’चे अनेक फायदे आहे. यामुळे वैज्ञानिक संवाददेखील प्रस्थापित होण्यास मदत होते. जगभरात वनस्पतीशास्त्राचा ‘डेटाबेस’ विकसित करण्यासाठी ‘डेल्टा’हे ‘सॉफ्टवेअर’ वापरण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.टी.श्रीनिवासु यांनी दिली.राज्यामध्ये मुंबईत सर्वात जास्त जैविक विविधता आहे व तेथे १६५ विविध प्रकारच्या वनस्पतींच्या शाखा आढळून येतात. नागपुरात हेच प्रमाण १२० इतके आहे. नागपूर व मुंबईत वैद्यकीय गुण असलेली ‘स्पिजेलिआ अॅन्थेल्मिआ’ ही वनस्पतीदेखील आढळली आहे. नागपूर, मुंबई व चंद्रपूर येथील वनस्पतींचा ‘डिजिटल डेटाबेस’ तयार करण्यात आला आहे, असेदेखील त्यांनी सांगितलेयावेळी डॉ.साधना रायलु यांनी डॉ.अशोक जुवारकर यांच्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकला. डॉ.जुवारकर यांच्या संशोधनामुळे कृषी व पर्यावरण क्षेत्राला नवीन दिशा मिळाली असे त्या म्हणाल्या. आकांक्षा यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.
‘डिजिटल डेटाबेस’ काळाची गरज; टी.श्रीनिवासु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:54 AM
‘डिजिटल डेटाबेस’ ही काळाची गरज असून याचा फायदा विद्यार्थी व विद्यापीठांनादेखील निश्चितच मिळेल, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.टी.श्रीनिवासु यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान