शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
2
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
3
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
4
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
5
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
6
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
7
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
8
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
9
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
10
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
11
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
12
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
13
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
14
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
15
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
16
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
17
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
18
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
19
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
20
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

दिलीप ग्वालबन्सीचे गुन्हे शंभरी पार

By admin | Published: May 25, 2017 1:35 AM

आपल्या टोळीमार्फत दहशत माजवीत दुसऱ्याच्या जमिनी आणि भूखंडांवर कब्जा करून कब्ज्यातील भूखंड मोकळे करण्यासाठी खंडणी वसूल करणारा ...

१९९१ पासून गुन्हेगारीत सक्रियलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या टोळीमार्फत दहशत माजवीत दुसऱ्याच्या जमिनी आणि भूखंडांवर कब्जा करून कब्ज्यातील भूखंड मोकळे करण्यासाठी खंडणी वसूल करणारा भूमाफिया मकरधोकडा येथील रहिवासी दिलीप शिवदास ग्वालबन्सी हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात ११५ गुन्हे दाखल आहेत. हसनबागेतील कुख्यात गुन्हेगार समशेर अली रमजान अली याच्यानंतर दिलीप ग्वालबन्सी हा सर्वाधिक गुन्हे असलेला गुन्हेगार म्हणून चर्चेत आला आहे. शहर पोलीस दलाकडून प्राप्त झालेला दिलीप ग्वालबन्सी याचा गुन्हेगारी अभिलेख असा, सदर पोलीस ठाण्यात १९९१ मध्ये त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने हा खून केला होता. त्यानंतर याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३२५ (दुखापत) आणि २००० मध्ये भादंविच्या १४३, ३५२ (बेकायदेशीर जमाव करून हल्ला), असे गुन्हे दाखल आहेत. चालू वर्षी २०१७ मध्ये बनावट दस्तावेज तयार करून भूखंड बळकावण्याबाबत भादंविच्या ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. कोराडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १७९/२०१३ अंतर्गत भादंविच्या १४३, १४७, ४४७, ४४८ (अतिक्रमण), अपराध क्रमांक २९/२०१३ अंतर्गत ४४७, ४४८, ५०६ (ब), पुन्हा भादंविच्या ३८०, ४४७, ४४८, ४२७, अपराध क्रमांक ८१/२०१७ अंतर्गत १४३, १४८, ३४१, ३४७, ३८५, ३८७ (खंडणी), ५०४ आणि ५०६ (ब) कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. अपराध क्रमांक ८५/२०१७ अंतर्गत भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३७८, अपराध क्रमांक ७७/२०१७ अंतर्गत ३४१, ३८४, ३८७, ५०६ (ब) आणि भारतीय हत्यार कायद्याच्या ३/२५, २७ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २२०/२०१२ अंतर्गत ४४७, ५०६ (अ), अपराध क्रमांक २०४/२०१२ अंतर्गत भादंविच्या ३२६, १४३, १४४, १४८, १४९, अपराध क्रमांक ६८/२०१३ अंतर्गत भादंविच्या ४४७, २९४, ५०६ (ब), अपराध क्रमांक ५६/२०१३ अंतर्गत ४४७, ४४८, २९४, ५०६ (ब), चालू वर्षी अपराध क्रमांक १२०/२०१७ अंतर्गत भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३८७, अपराध क्रमांक १२१/२०१७ अंतर्गत भादंविच्या १४३, १४७, १४९, ३४१, ३४७, ३८७, ५०४, ५०६ (ब), अपराध क्रमांक २२३/२०१७ अंतर्गत भादंविच्या ३८७, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४४७, ५०६ (ब), ४२७, १२०(ब) (गुन्हेगारी कट) आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या ३९ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अपराध क्रमांक २२९/२०१७ अंतर्गत भादंविच्या ३४१, ३८४, ३८७, ५०४, ५०६(ब), अपराध क्रमांक २४७/२०१७ अंतर्गत भादंविच्या १४१, १४३, ३४१, ३५२, ३८७, ३४, अपराध क्रमांक २४८/२०१७ अंतर्गत १४३, १४७, १४९, ३४१, ३४७, ३८७, ५०४, ५०६(ब) कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. मानकापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७२/२०१७ अंतर्गत भादंविच्या ३४१, ३५२, ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(जी), (डब्ल्यू)(१)(२), ३(२)(व्हीए) गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अपराध क्रमांक ७३/२०१७ अंतर्गत भादंविच्या कलम ३४१,३५२, ५०४, ५०६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(जी)(आर)(एस), ३(२)(व्हीए) गुन्हे दाखल आहेत.दिलीप ग्वालबन्सी याला महाराष्ट्र झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत स्थानबद्धही करण्यात आले होते. तरीही त्याने कायद्याची कोणतीही भीती न बाळगता आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले. बैरामजी टाऊन येथील तरुण प्रॉपर्टी डीलर भूपेश सोनटक्के याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याची गोरेवाडा येथील कोट्यवधीची जमीन दिलीपने हडपली होती. भूपेशने एका चिठ्ठीत दिलीपच्या कृत्याचा पाढा लिहून आत्महत्या करताच शहर पोलीस दलात खळबळ उडाली. दिलीप ग्वालबन्सी याला अटक केल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी एका आदेशान्वये विशेष तपास पथक नेमले. हे पथक दिलीप ग्वालबन्सीचे अनेक पाप चव्हाट्यावर आणत आहेत.