मंत्रालयाच्या ट्रान्सफर रॅकेटशी दिलीप खोडेचे थेट 'कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:40 AM2023-03-31T11:40:48+5:302023-03-31T11:43:12+5:30

बदली-वसुलीसाठी विशेष पथक : १५ वर्षांपासून याच उठाठेवीत सक्रिय

Dilip Khode's Direct 'Connection' to Ministry's Transfer Racket | मंत्रालयाच्या ट्रान्सफर रॅकेटशी दिलीप खोडेचे थेट 'कनेक्शन'

मंत्रालयाच्या ट्रान्सफर रॅकेटशी दिलीप खोडेचे थेट 'कनेक्शन'

googlenewsNext

जगदीश जोशी

नागपूर : मंत्रालयाचा ‘ओएसडी’ असल्याचे सांगून काॅंग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाख रुपयांची लाच घेताना सापडलेला दिलीप खोडे हा १५ वर्षांपासून मंत्रालयात सक्रिय होता. तो मंत्रालयातील संपर्काचा वापर करून ट्रान्सफर रॅकेट चालवत होता. परंतु, लाचलुचपत विभागाला खोडे आपण निर्दोष असल्याचे सांगत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मार्चला परिवहन अधिकाऱ्याकडून २५ लाखांची लाच घेताना खोडेला अटक केली आहे. यात शेखर भोयर हा फरार आहे. तक्रारकर्ता परिवहन अधिकाऱ्याविरुद्ध आरटीओतील महिलेने लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी काॅंग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडून विधान परिषदेत न उचलण्याच्या मोबदल्यात खोडेने परिवहन अधिकाऱ्याला ५०-५० लाख रुपये मागितले होते. चर्चा केल्यावर तो २५ लाख घेण्यास तयार झाला होता. त्यानंतर एसीबीने खोडेला पकडले आहे.

सूत्रांनुसार खोडे २००८ मध्ये अमरावतीच्या एमआयडीसीत तंत्रज्ञ पदावर नियुक्त झाला होता. काही दिवस यवतमाळला घालविल्यानंतर त्याला मंत्रालयात नियुक्ती मिळाली. तो २००९ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन गृहमंत्र्यांचा ओएसडी नियुक्त झाला. कामकाजाचा कोणताही अनुभव नसताना त्याला ओएसडी बनविण्यात आले. त्यानंतर २०१० मध्ये त्याला स्वीय सहायक म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१६ मध्ये त्याला उद्योग व खनिकर्म राज्यमंत्र्यांचा ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आले.

दिलीप खोडे २००९ पासून आतापर्यंत अनेक मंत्री, नेता आणि अधिकारी किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी जुळलेला आहे. या लोकांच्या माध्यमातून तो दरवर्षी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून मनासारखी नेमणूक मिळवून देत होता. या बदल्यांमधून दरवर्षी कोट्यवधींचा व्यवहार होत होता. खोडेजवळ फरार असलेल्या शेखर भोयरसह आठ ते दहा जणांची टीम आहे. ही टीम ग्राहक पटविणे आणि पैशांच्या व्यवहाराचे काम करते. चौकशीत खोडे लाच घेतल्याचे अमान्य करत आहे. एसीबी त्याची मंत्रालयात नियुक्ती तसेच आतापर्यंतच्या कार्यकाळाची माहिती गोळा करत आहे.

Web Title: Dilip Khode's Direct 'Connection' to Ministry's Transfer Racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.