तावडेंना चर्चेचे वावडे

By admin | Published: November 2, 2015 02:03 AM2015-11-02T02:03:04+5:302015-11-02T02:03:04+5:30

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या मसुद्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे स्वत: आपली मते ऐकून घेणार म्हणून ..

Discussion discussions | तावडेंना चर्चेचे वावडे

तावडेंना चर्चेचे वावडे

Next

नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या मसुद्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे स्वत: आपली मते ऐकून घेणार म्हणून नागपूरातील शिक्षणतज्ज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु प्रत्यक्षात मते मांडण्यासाठी २ तासांऐवजी केवळ ४० मिनिटेच संधी मिळाली व अवघ्या दीड तासात सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती केवळ ‘फार्स’ म्हणून सगळीकडे जाते आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील काही तरतुदी कालबाह्य झाल्या आहेत. नवीन विद्यापीठ कायद्याचा मसुदा अंतिम करण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती रविवारी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आली होती. यावेळी आ.अनिल सोले, आ. नागो गाणार, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर, समिती सदस्य राजेश पांडे, डॉ. अपूर्वा पालकर, आनंद मापुसकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय दीक्षांत सभागृहात नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठातील विद्यापीठ वर्तुळातील तज्ज्ञ होते.
नियोजित वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम ९ वाजता सुरू होणार होता. परंतु प्रत्यक्षात ५० मिनिटे उशिरा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर स्वागत, प्रास्ताविक यातच २० मिनिटे गेली.

Web Title: Discussion discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.