प्रा. वामन निंबाळकर यांनी विपुल साहित्य लेखन करून आंबेडकरी आणि मराठी साहित्यात माेलाची भर टाकली आहे. त्यांच्या लेखनाने आंबेडकरी चळवळीला श्रीमंती दिली आहे. तळागाळात, अंधारात खितपत असलेल्या समाजाचे दु:ख, त्यांच्या भळभळत्या जखमा साहित्यातून समाजासमाेर मांडल्या. असंख्य पुरस्कारप्राप्त प्रा. निंबाळकर यांच्या लेखन प्रवासाचा सांगाेपांग आढावा घेण्याचा प्रयत्न विविध साहित्यिक संस्थांच्या वतीने घेतला जाणार आहे. काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेेणे शक्य नसले तरी व्हर्चुअल कार्यक्रमांद्वारे त्यांच्या बहुमाल याेगदानाचे स्मरण केले जात आहे. १८ मार्च राेजी बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीडच्या पदवी व पदव्युत्तर विभागातर्फे ‘कविवर्य प्रा. वामन निंबाळकर यांचा लेखनप्रवास’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी ११ च्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. वसंत सानप यांच्या अध्यक्षतेत स्वारातीम विद्यापीठ, नांदेडचे प्रा. डाॅ. राजेंद्र गणाेरकर हे मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या डाॅ. रूपाली अवचरे या वामन निंबाळकर यांच्या कवितांतील मूल्यदर्शनावर प्रकाश टाकतील. याशिवाय नागपूर, अमरावतीसह विविध महाविद्यालयांत ऑनलाइन कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येणार आहे.
कविवर्य वामन निंबाळकर यांच्या लेखनप्रवासावर चर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:15 AM