रागाने बघितल्यावरून दोन गटांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:32+5:302021-06-09T04:09:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रागावून बघत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. त्यानंतर, भेटायला बोलावण्याचा बहाना ...

Dispute between the two groups after seeing the anger | रागाने बघितल्यावरून दोन गटांत वाद

रागाने बघितल्यावरून दोन गटांत वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रागावून बघत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. त्यानंतर, भेटायला बोलावण्याचा बहाना करून ८ ते १० आरोपींनी तिघांवर हल्ला केला, तर एकाला चाकूने भोसकून जबर जखमी केले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री १०.३० ते ११च्या दरम्यान ही घटना घडली. कल्पेश उर्फ दादा सूरज राबा (वय १८) हा या हल्ल्यात गंभीर तर त्याचा मित्र आणि भाऊ दोघे जबर जखमी झाले.

कल्पेशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सलमान शेख, समशेर, जावेद यांच्यासोबत कल्पेशची दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती. तू आमच्याकडे रागाने का बघतो, अशी विचारणा करून, आरोपींनी वाद वाढविला होता. रविवारी रात्री १०.३० वाजता आरोपी सलमानने कल्पेशला याबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने कपिलनगरातील एका मैदानात बोलवले. त्यानंतर, कल्पेश त्याचा भाऊ आणि एका मित्राला घेऊन गेला. तेथे आरोपी सलमान, समशेर, जावेद, इम्रान, समीर अली, शाहरुख पठाण, मोहम्मद राजिक, साहिल शेंडे, आकाश केतवास आणि त्यांचे साथीदार होते. त्यांनी कल्पेश, तसेच त्याचा भाऊ आणि मित्राला ‘बहोत गरम चल रहे क्या’ म्हणत मारहाण केली. आरोपींनी कल्पेशला चाकूने भोसकून जखमी केले. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. यानंतर, पोलिसांना माहिती देण्यात आली. कपिलनगरचे ठाणेदार अमोल देशमुख आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी एका अल्पवयीन आरोपीसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमवून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. जखमी कल्पेशला रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले.

---

प्रचंड तणाव

या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तिकडे मोठा बंदोबस्त लावला आहे. अटकेतील, तसेच फरार आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

---

Web Title: Dispute between the two groups after seeing the anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.