विघ्नहर्त्याच्या मूर्ती व्यवसायावर विघ्न; मूर्तीकारांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:00 PM2020-07-04T23:00:00+5:302020-07-04T23:00:07+5:30

सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे.

Disruption to the idol business ; Confusion among sculptors | विघ्नहर्त्याच्या मूर्ती व्यवसायावर विघ्न; मूर्तीकारांमध्ये संभ्रम

विघ्नहर्त्याच्या मूर्ती व्यवसायावर विघ्न; मूर्तीकारांमध्ये संभ्रम

Next
ठळक मुद्देअजूनपर्यंत ऑर्डर्स नाहीत

धीरज शुक्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीगणेशोत्सवास २२ ऑगस्टपासून प्रारंभ होतो आहे. तरीदेखील या उत्सवाच्या भव्यदिव्यतेवर संभ्रम संपलेला नाही. मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांना उत्सवाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे तर मुर्तीकारांना मूर्तीच्या ऑर्डर्सची. कोविड-१९च्या संकटात विघ्नहर्त्याप्रति आस्थेचा भाव असणाऱ्यांना भक्तांना देवाच्या कृपेची आशा आहे आणि हा पर्व जल्लोषात साजरा होईल, अशी अपेक्षा आहे.
श्रीगणेशाच्या मूर्ती बनविणाऱ्यांकडे कायम वर्दळ असणाऱ्या चितारओळीमध्ये कोरोनामुळे नीरव शांतता पसरली आहे. सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे. मूर्तीकार मूर्ती बनवतील अशी अपेक्षा आयोजकांमध्ये आहे तर आयोजक परवानगी घेऊन ऑर्डर देतील अशी अपेक्षा मुर्तीकारांना आहे.

त्याच अनुषंगाने काही आयोजक मनपा प्रशासनाकडून उत्सवाची परवानगी घेण्यासाठी पोहोचलेही होते. मात्र, परवानगी २१ दिवस आधी म्हणजेच १ ऑगस्टला मिळेल असे सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे मुर्तीकारांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. जर अशा तºहेने परवानगी दिली आणि आयोजकांनी त्यानंतर ऑर्डर दिली तर मोठ्या परिश्रमानेही एवढ्या कमी वेळेत केवळ दोन ते चारच मूर्ती आकार घेऊ शकणार असल्याचे मूर्तीकार सांगतात. जर असेच झाले तर वर्षभराचा रहाटगाडा कसा चालेल? आणि याच क्षेत्रात ऐन व्यवसायाच्या काळात कोरोना संक्रमित आढळला तर व्यवसाय आणि परिश्रम दोन्हीचा सत्यानाश होईल, अशी भिती मुर्तीकारांमध्ये निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीच तयारी दिसून येत नाही.

महागाई वाढली, भाड्याचा भारही डोक्यावर!
: या काळात मुर्तीकार दुहेरी संकटात सापडले आहे. मूर्ती बनविण्यात उपयोगात येणारी माती, बारदाना, लाकूड आणि रंगाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे, हा कच्चा माल ३० ते ४० टक्के महाग घेतला जात आहे. काही मुर्तीकारांनी ५० ते एक लाख रुपये प्रमाणे दुकाने भाड्याने घेतले आहे. मात्र, मूर्तींसाठीचे ऑर्डर्स येत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा स्थितीत भाडे द्यायचे की मूर्तीचे साहित्य आणायचे, अशी विवंचना आहे. तुर्तास चार फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी भंडारा, यवतमाळ, छिंदवाडा आदी ठिाकाणांहून माती मागवली जात आहे.

पीओपीची गाडी अजूनही सुसाट
 सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाने काहीच दिवसांपूर्वी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले होते तरी देखील शहरात या मूर्ती येत आहेत. अमरावती, काटोल, वरूड आदी ठिकाणांहून या मूर्ती शहरात पोहोचत आहेत.

सरकारने धोरण स्पष्ट करावे - चंद्रशेखर बिंड
 रामनवमी उत्सवासाठी मूर्ती बनविणाºया मूतीर्कारांना ऐनवेळी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. श्रीगणेशोत्सवासाठी आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे, सरकारने आपले धोरण स्पष्ट केल्यावरच मोठ्या मूर्तींच्या निमार्णासंदर्भात आपले धोरण स्पष्ट करणे अपेक्षित असल्याची भावना सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर बिंड यांनी व्यक्त केली.

वर्षभराच्या अपेक्षेवर फेरले पाणी - विजय तायवाडे
 मूतीर्कारांना वर्षभर श्रीगणेशोत्सवाची प्रतिक्षा असते. मूर्तींच्या भरवशावरच मूतीर्कारांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह होत असते. मात्र, परवानगी संदर्भात कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने आमच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेल्याचे सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे सचिव विजय तायवाडे यांनी सांगितले.
 

Web Title: Disruption to the idol business ; Confusion among sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.