लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडपपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.हैदराबाद हाऊस सभागृहात दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात शुक्रवारी पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पारपडली.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र्र सिंह, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रा. राजीव हडप, विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाय, नागपूर सुधार प्रन्यासचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, झोपडपट्टी विकास प्रकल्प अधिकारी डी.डी. जांभुळकर, प्रकल्प सल्लागार लिना बुधे उपस्थित होते.नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून त्यापैकी २९३ घोषित झोपडपट्ट्या आहेत. यापैकी १५ महानगरपालिकेच्या, ५२ नागपूर सुधार प्रन्यासच्या तर २२६ राज्य शासनाच्या व खासगी तसेच इतर विभागाच्या जागेवर वसलेले आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात ६७ झोपडपट्ट्या असून यापैकी ४३ झोपडपट्ट्या शासनातर्फे घोषित आहेत.मनपाच्या जागेवरील ४ झोपडपट्यांमध्ये १७१९ पट्टेधारक असून यामध्ये तकीया धंतोली, फकीरनगर, रामबाग आदी वस्त्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिर लावून संपूर्ण प्रक्रिया १५ आॅगस्ट पूर्वी पूर्ण करावी. नासुप्रच्या जागेवर ५ झोपडपट्ट्या असून यातील सुमारे १५१२ पट्टेधारकांना पहिल्या टप्प्यात प्रक्रिया पूर्ण करावी, असेही यावेळी सांगितले.शासनाच्या जागेवर असलेल्या १० झापेडपट्ट्याध्ये राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महानगरपालिकेला हस्तांतरित करावी. तसेच २४ झोपडपट्ट्या अद्याप घोषित झालेल्या नसल्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन झोपडपट्टी घोषित करण्यासाठी शासनाकडे येत्या आठ दिवसात प्रस्ताव तयार करावा.दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जाटतरोडी, बोरकर नगर, इंदिरानगर जाटतरोडी, कुंदनलाल लॉयब्ररीच्या मागे बोरकर नगर, काफला वस्ती, टिंबर मार्केट, शिफर कॉलोनी, इमामवाडा, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पवारटोली (दीक्षाभूमी), कैकाडी नगर, परसोडी, कामगार कॉलोनी व संत तुकडोजी नगर आदी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना केली.------------------
नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:47 PM
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडपपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : मिशन मोडवर प्राधान्य देण्याच्या सूचना