जिल्ह्यातून २१४९ नागरिकांना वाहतूक परवान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:42 PM2020-05-08T23:42:40+5:302020-05-08T23:45:44+5:30

राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठीच्या वाहतूक परवान्यांचे वाटप सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यातील २ हजार १४९ नागरिकांना वाहतूक परवाने देण्यात आले.

Distribution of transport licenses to 2149 citizens from the district | जिल्ह्यातून २१४९ नागरिकांना वाहतूक परवान्याचे वाटप

जिल्ह्यातून २१४९ नागरिकांना वाहतूक परवान्याचे वाटप

Next
ठळक मुद्देइतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवाने वाटपास सुरुवात : राज्यातच जाणारे सुमारे १३०० लोक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठीच्या वाहतूक परवान्यांचे वाटप सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यातील २ हजार १४९ नागरिकांना वाहतूक परवाने देण्यात आले. यातील १ हजार २९० लोक नागपूर मनपा हद्दीतील असून इतर ८५९ नागरिक हे ग्रामीण भागातील आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
ज्यांना नागपुरातून बाहेर जायचे होते किंवा इतर ठिकाणांहून नागपुरात यायचे होते त्यांच्यासाठी २ मे पर्यंत आॅनलाईन ‘लिंक’ सुरू होती. त्यावर प्रशासनाला ६ हजार ९६६ अर्ज प्राप्त झाले. यातील २ हजार ४६९ जणांनी स्वत:च्या वाहनाने जाण्यासाठी अर्ज केले होते. २३८ अर्जदारांचे पत्ते अपूर्ण होते तर ८२ जण ‘कन्टेनमेन्ट’ भागातील असल्याने त्यांचे अर्ज नाकारण्यात आले. उर्वरित लोकांना सेतू कार्यालय व तहसिल कार्यालयांच्या माध्यमातून वाहतूक परवान्यांचे वाटप करण्यात आले. ४ हजार ४९० व्यक्तींनी शासकीय वाहनातून जाण्यास पसंती दिली आहे.

नागपुरात येण्यासाठी साडेपाच हजारांहून अधिक अर्ज
इतर राज्य किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून नागपुरात येण्यासाठी प्रशासनाकडे ५ हजार ६६४ अर्ज आले. यात इतर राज्यातील १ हजार ८५० व्यक्तींचा समावेश आहे तर राज्यातील इतर जिल्ह्यातून येण्यासाठी ३ हजार ८१४ व्यक्तींनी अर्ज केला आहे.
 

Web Title: Distribution of transport licenses to 2149 citizens from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.