बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी पडू नका : विजय सातोकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:53 PM2018-11-16T23:53:00+5:302018-11-16T23:54:23+5:30
डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ मास कम्युनिकेशन केंद्राचे संचालक विजय सातोकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ मास कम्युनिकेशन केंद्राचे संचालक विजय सातोकर यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक पत्रकार भवन येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिवस आयोजित करण्यात आला होता. ‘डिजिटल युगातील पत्रकारिता आचारनीती आणि आव्हाने’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना विजय सातोकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनीही डिजिटल माध्यमांच्या आव्हानासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले. माहिती संचालक अनिल गडेकर, वृत्तपत्र व जनसंवाद विभागाचे प्रा. मोईज हक व्यासपीठावर होते.
सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी केले. संचालन सहायक संचालक शैलजा वाघ-दांदळे यांनी तर माहिती संचालक अनिल गडेकर यांनी आभार मानले.