निर्जतुकीकरण डोम किंवा टनेल नको : केंद्र सरकाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:59 PM2020-04-20T22:59:40+5:302020-04-20T23:00:42+5:30
‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरू शकतात. यामुळे असे रसायन फवारणी करणारे ‘डोम’ किंवा ‘टनेल’ निर्माण करू नये, असे केंद्र शासनाचे निर्देश असल्याचे पत्र आरोग्य सेवा संचालनालयाने काढले आहे.
विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) या विषयी सूचना केल्या आहेत. त्यांच्या मते, निर्जंतुकीकरण करणारे टनेल स्थापन केल्यास कोरोनाची लागण होणार नाही, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. चेन्नई सार्वजनिक आरोग्य विभागानेही या विषयी असे न्तिुाजुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ निर्माण करू नका, अशा सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नागपुरात काही पोलीस ठाण्याच्या व्हॅनमध्ये सॅनिटेशन करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. नंदनवन वसाहतीमध्ये असेच एक ‘टनेल’ सुरू करण्यात आले होते. तर गिट्टीखदान येथील एका व्यक्तीने असे ‘सॅनिटेशन टनेल’ तयार करून जिल्हाधकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. तज्ञ्जानुसार या ‘टनेल’ किंवा ‘डोम’मध्ये फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे अतिरीक्त रसायन जसे अल्कोहल, क्लोरीन, लॉयसॉल हानिकारक असते. निर्जंतुकीकरणात याचा किती फायदा होतो, हे अद्यापही सामोर आले नाही. परंतु ही रसायने हानी पोहचवू शकतात. यामुळे केंद्र शासनाने असे टनेल किंवा डोम किंवा त्यासदृश यंत्रणांचा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा संचालकांनी आपल्या पत्रातून दिली आहे.