समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:42+5:302021-06-04T04:06:42+5:30

नागपूर : राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी ...

Do not sow until satisfactory rainfall | समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका

समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका

Next

नागपूर : राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेसा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरु शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

४ जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ५ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते व पुणे येथील कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनासाठी पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग व मका या खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखाराच्या पाळ्या देऊन तयार करावी, असे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

-----------

Web Title: Do not sow until satisfactory rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.