काम पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु ; गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:28 AM2019-08-18T11:28:19+5:302019-08-18T11:31:19+5:30

एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

do work properly or will tell the people to teach u lesson; says gadkari to officers | काम पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु ; गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

काम पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु ; गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

Next

नागपूर : एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. आठ दिवसात समस्या साेडवा अन्यथा लाेकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगिन अशी तंबी आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित हाेते. यावेळी आपण अधिकाऱ्यांनी काम न केल्यास त्यांची लाेकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले, आज मी परिवहन कार्यालयात एक बैठक घेतली. ज्यात परिवहन आयुक्त सुद्धा उपस्थित हाेते. मी त्यांना म्हंटलं की तुम्ही आठ दिवसांच्या आत लाेकांच्या समस्या साेडवा अन्यथा लाेकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगिन. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी पुढे म्हणाले. 

लालफितीच्या कारभराविषयी नाराजी व्यक्त करताना गडकरी म्हणाले, आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छीताे की तुम्ही सरकारी नाेकर आहात. मी लाेकांमधून निवडून आलाे आहे. मी लाेकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चाेरी करत असाल तर मी तुम्हाला एक चाेर म्हणीन. तसेच या अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्याजकांना कुठलिही भिती मनात न बाळगता व्यवसाय करा अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असेही त्यांनी सागितले. 

Web Title: do work properly or will tell the people to teach u lesson; says gadkari to officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.