गरीबांचा रोजगार हिरावू नका : फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रेत्यांचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 09:06 PM2020-02-10T21:06:28+5:302020-02-10T21:12:26+5:30

महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला.

Don't forsake the employment of the poor: Footpath shopkeepers and vegetable vendors's morcha | गरीबांचा रोजगार हिरावू नका : फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रेत्यांचा मनपावर मोर्चा

गरीबांचा रोजगार हिरावू नका : फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रेत्यांचा मनपावर मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ च्या आदेशानुसार फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रे त्यांना संरक्षण दिले आहे. केंद्र सरकारनेही विधेयक पारित केले आहे. महाराष्ट्र शासनाने २०१६ मध्ये पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन लागू केला आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. महापालिकेने गरीब लोकांचा रोजगार हिरावू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
आमदार प्रकाश गजभिये, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, जुल्फेकार अहमद भुट्टो, कमलेश चौधरी, हॉकर्स संघटनेचे नेते रज्जाक कुरेशी, कार्याध्यक्ष दिलीप रंगारी आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शहरात हॉकर्स झोनची निर्मिती व शहर विकास आराखड्यानुसार आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून टाऊ न वेंडिंग कमिटी गठित क रणे आवश्यक आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शहरातील फेरीवाले व भाजी विक्रे त्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. यामुळे शहरातील ९० हजार लोकांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने आठवडी बाजार व फेरीवाल्यांच्या विरुद्ध सुरू केलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी प्रकाश गजभिये यांनी केली.
४० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात लोकसंख्येच्या आधारावर बाजारासाठी जागा उपलब्ध करणे अपेक्षित होते. आठवडी बाजार ही नागरिकांची गरजच आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियमानुसार फेरीवाल्यांना संरक्षण प्राप्त आहे. बाजारातील विक्रे त्यांना शिस्त लावण्याला विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका,अतिक्रमणाच्या नावाखाली भाजी विक्रे ते व हॉकर्सवर कारवाई होत असेल तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी उभे राहू, अशी भूमिका प्रफुल्ल गुडधे यांनी मांडली.
यावेळी जुल्फेकार अहमद भुट्टो, रज्जाक कुरेशी व दिलीप रंगारी यांनीही भाषणातून महापालिकेच्या कारवाईला विरोध दर्शविला. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली विक्रे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांना निवेदन दिले. यासंदर्भात बुधवारी संयुक्त बैठक आयोजित करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. मोर्चात टाऊ न वेडिंग कमिटीचे सदस्य गोपी आंभोरे, संदीप गुहे, मारोती पटेल, प्रमोद मिश्रा, नेहा ओचानी, रितू मोहने, सुनील सूर्यवंशी, प्रकाश भगत, अविनाश निरपुडे, सुधाकर चकोले, अकबर भाई, संदीप शाहू, साबीर भाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अतिक्रमण कारवाईच्या विरोधात झाडे चौकात निदर्शने
२०१४ मध्ये शहरात ११७ हॉकर्स झोन निर्माण करण्यात आले होते. यातील ८६ हॉकर्स झोनमध्ये जागेचे वाटप करण्यात आले होते.
सोमवारी सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या झाडे चौक येथील आठवडी बाजार भरण्याला महापालिकेच्या पथकाने विरोध केला. या विरोधात नंदकि शोर शर्मा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शहरातील बड्या लोकांच्या अतिक्रमणावर कारवाई न करता हॉकर्स व भाजीविक्रेत्यांवर होत असलेल्या कारवाईला विरोध दर्शविला. आंदोलनात कडेबहाद्दूर दुबे, सुनील साहू, शिवदयाल शर्मा, संतोष गुप्ता यांच्यासह विक्रेते आंदोलनात सहभागी झाले होते.

कारवाई विरोधात हॉकर्सचा बंद
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली फेरीवाले व भाजी विक्रेत्यांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सोमवारी हॉकर्सने बंद पुकारला. यामुळे  महाल, कॉटनमार्केट, गणेशपेठ बस स्थानक  तसेच सीताबर्डी सोमवारी शुकशुकाट होता. विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र सायंकाळी फूटपाथवर दुकाने लागली होती. 

Web Title: Don't forsake the employment of the poor: Footpath shopkeepers and vegetable vendors's morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.