नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यांतील हाडवैर सर्वश्रुत आहे आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी विधिमंडळाचे कामकाज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर चौफेर टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. सध्याच्या परिस्थितीत मला राज्याची चिंता वाटते. राज्याचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. माात्र सध्याचे मुख्यमंत्री तसे प्रयत्न करतील याबाबत मला शंका वाटते, असे नारायण राणे म्हणाले. नागपूरमध्ये भाजपा आमदारांशी संवाद साधल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमन असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. महाराष्ट्र अधोगतीकडे गेल्यास सत्ताधारी जबाबदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा अवमान केल्याचाही आरोप नारायण राणेंनी केला. ''राज्यपाल विधिमंडळ परिसरात येतात तेव्हा मुख्यमंत्री स्वागताला जातात, पण ह्या प्रथा परंपरा मुख्यमंत्री डावलत आहेत. मी राज्यपालांचे अभिभाषण आणि त्यावर आभार मानणारे मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचले. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना अशा प्रकारचे भाषण यापूर्वी एकाही मुख्यमंत्र्याने केले नव्हते. ज्या शैलीतून राज्यपालांना मानसन्मान मिळेल असे भाषण केले पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणामधून अत्यंत हलक्या थराची भाषा वापरली गेली, असा आरोप नारायण राणेंनी केला. राज्यासाठी जनतेचे हित समोर ठेवणारे असे भाषण राज्यपालांनी केले. मात्र त्याला साजेसं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेने केवळ सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. पण शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी झाला होता. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते ना आघाडी झाली असती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फक्त स्वतःच्या साठी मुख्यमंत्री झाले, विचारांना मूठमाती दिली, आसा आरोपही नारायण राणेंनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 3:47 PM