डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 10:14 PM2022-01-08T22:14:11+5:302022-01-08T22:20:22+5:30
Nagpur News कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे.
नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे.
डॉ. वरखेडी यांच्या नावाची घोषणा शनिवारी करण्यात आली. आपला हा नवा पदभार ते कधी स्वीकारतील, याबाबत अजून स्पष्टता नाही. या नव्या घोषणेनंतर वरखेडी यांच्या जागी कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार कुणाला देण्यात येईल, हेसुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही.
नव्या कुलगुरूची नियुक्ती होईस्तोवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे हा प्रभार सोपविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डाॅ. वरखेडी यांचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेसोबतच विकास कार्यावर विशेषत्वाने भर दिला. त्यांच्या याच कार्यामुळे काही दिवसांपूर्वी मूल्यांकनासाठी आलेल्या नॅक कमेटीने विद्यापीठाला ‘ए प्लस’ ग्रेड प्रदान केली होती. ही ग्रेड प्राप्त करणारे हे विदर्भातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
.............