वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:49+5:302021-09-22T04:08:49+5:30

शहरात दहा हजारांहून अधिक मोकाट जनावरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीतील रस्त्यांवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. वाहन ...

Drive slowly; Mokat animals grew | वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली

वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली

Next

शहरात दहा हजारांहून अधिक मोकाट जनावरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीतील रस्त्यांवर जागोजागी मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. वाहन चालकांचा यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे अपघात होण्याची अधिक शक्यता असल्याने, वाहने सावकाश चालवा, शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यात जागोजागी रस्त्यांवर मोकाट जनावरे बसत असल्याने, या मोकाट जनावरांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

शहरात १,०४६ गोठे

नागपूर शहरात १,०४६ गोठे आहेत. यात ४५७ अधिकृत, तर ५८९ अनधिकृत आहेत. वर्दळीच्या व निवासी भागातील गोठ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. दुसरीकडे अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात, यामुळे अपघात होतात.

...

मोकाट जनावरांच्या तक्रारी वाढल्या

गोपालकांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे, तसेच महाराष्ट्र किपिंग अँड मूव्हमेंट ऑफ कॅट इन अर्बन एरिया (नियंत्रण) अधिनियम, १९७६चे पालन केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

...

मोकाट जनावरांचा वाली कोण?

शहरात ८ ते १० हजार मोकाट जनावरे आहेत. मनपाच्या कोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. आता दंडाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, परंतु यातूनही मोकाट जनावरांचा प्रश्न सुटलेला नसल्याने, या जनावरांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

नियमित कारवाई केली जाते

रस्त्यांवरील मोकाट जनावरांवर मनपाच्या कोंडवाडा विभागातर्फे नियमित कारवाई जाते. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. दंड आकारून प्रकरण वाहतूक पोलिसात तक्रार नोंदविली जाते, अशी माहिती मनपातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली.

...

या मार्गावर वाहने जपून चालवा

तुकडोजी पुतळा चौक ते मानोवाडा चौक

म्हाळगीनगर चौक ते पिपळा फाटा चौक

वंजारीनगर जलकुंभ ते छोटा ताजबाग

मोक्षधाम ते मध्यवर्ती बस स्थानक

क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक

कॉटन मार्केट ते आग्याराम देवी चौक

सक्करदरा ते दिघारी मार्ग

झिंगाबाई टाकळी परिसर

कळमणा मार्केट परिसर

पारडी, भरतवाडा परिसर

सिव्हिल लाइन पर

...

Web Title: Drive slowly; Mokat animals grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.