लाेकमत न्यूज नेटवर्क
वानाडाेंगरी : माेटरसायकलने आलेल्या अज्ञात तरुणांनी कारचालकास मारहाण करून त्यांच्याकडील कार, राेख रक्कम व माेबाईल हिसकावून घेत लुटले. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी (घारपुरे) शिवारातील दातार फाटा परिसरात साेमवारी (दि. २२) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. आराेपींनी याच कारचा वापर अन्य एकास लुटण्यासाठी केल्याचेही पाेलीस चाैकशीत निष्पन्न झाले.
अनिल हत्तीमारे (३८, रा. पाचपावली, नागपूर) हे त्यांच्या कारने सुकळी (घारपुरे) शिवारातील दातारा फाटा परिसरात जेवण करण्यासाठी थांबले हाेते. त्यातच विना नंबर प्लेटच्या माेटरसायकलवर आलेल्या दाेघांना त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील कारची चाबी, राेख रक्कम व माेबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी ती कार व इतर साहित्य घेऊन तिथून लगेच पळ काढला. ते ट्रिपल सीट आले हाेते, अशी माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
चाेरट्यांनी पुढे याच कारचा वापर दुसऱ्या व्यक्तीला लुटण्यासाठी केल्याचेही पाेलीस तपासात समाेर आले आहे. दरम्यान, बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी शिवारात मुकेश कुवर, रा. नागपूर यांना लुटल्याची घटना घडली. यात चाेरट्यांनी त्यांच्या पाेटावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही कार वाठाेडा शिवारातून जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.
...
कार जप्त, एलसीपीची कारवाई
आराेपींनी सुकळी (घारपुरे) शिवारातून हिसकावून नेलेली कार बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठाेडा शिवारात आढळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. मुकेश कुवर, रा. नागपूर यांच्या पाेटावर चाकूने वार करून त्यांच्याकडील साेनसाखळी लुटल्याची घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी शिवारात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली हाेती. या घटनेत आराेपींनी त्या कारचा वापर केल्याचेही अनिल जिट्टावार यांनी स्पष्ट केले.