कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 11:31 AM2021-10-31T11:31:52+5:302021-10-31T11:40:31+5:30

अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Drug dealer chitra caught selling drugs at shantinagar nagpur | कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त

कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त

Next
ठळक मुद्देशांतीनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शांतीनगरातील कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्रा ठाकूर (वय ३२) हिच्याकडे पोलिसांनी छापा टाकून २८ ग्रॅम गर्द जप्त केली. शनिवारी सायंकाळी सुरू झालेली कारवाई पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत सुरू होती.

ईतवारी रेल्वे स्टेशनजवळ राहणारी चित्रा अनेक दिवसांपासून अमली पदार्थ विक्रीच्या गोरखधंद्यात सहभागी आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तिच्यावर काही दिवसांपासून नजर ठेवून होते. शनिवारी ती ग्राहकांना अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे, चित्रा आणि तिची आई चंदा ठाकूर या दोघी अनेक वर्षांपासून ड्रग्ज विक्रीच्या गोरखधंद्यात सहभागी आहेत. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चंदाविरुद्ध अशीच कारवाई केली होती, तर शनिवारी चित्राला पोलिसांनी जेरबंद केले. तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

विविध पोलीस ठाण्यात गुन्हे

चंदा आणि चित्राविरुद्ध शांतीनगरच नव्हे, तर विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलिसांनीही चित्राविरुद्ध यापूर्वी कारवाई केलेली आहे.

Web Title: Drug dealer chitra caught selling drugs at shantinagar nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.