लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून पाच रेल्वेगाड्या आपल्या नियोजित रेल्वेस्थानकापूर्वी समाप्त (शॉर्ट टर्मिनेट) करण्यात आल्या आहेत.मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. गुरुवारी १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस मुंबईऐवजी नाशिकला, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस नाशिकवरून हावडाला सुटणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस भुसावळला समाप्त करण्यात आली असून १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस भुसावळवरुन गोंदियासाठी सोडण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरीवरून सोडण्यात आली. काही रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. यात १२२६१ मुंबई-हावडा एसी दुरांतो एक्स्प्रेस सहा तास, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ६.४० तास उशिराने धावत आहे. प्रवाशांनी रेल्वेगाड्यांच्या वेळा पाहून आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दुरांतो एक्स्प्रेस रद्द, ५ गाड्या ‘शॉर्ट टर्मिनेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 10:41 PM
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.
ठळक मुद्देमुंबईतील पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत