नागपूरवर दहा वर्षात धूलिकणांचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:44 AM2020-11-13T11:44:15+5:302020-11-13T11:44:41+5:30

Nagpur News pollution कॉर्बन मोनाक्साईडसह ओझोन व बेंझीनच्या प्रदूषणानेही शहरावरचे संकट वाढवले आहे. घुग्गुस व चंद्रपूरसह नागपूरमध्येही हे दाेन्ही घटकाचे प्रदूषण वाढत आहे.

Dust crisis in Nagpur in ten years | नागपूरवर दहा वर्षात धूलिकणांचे संकट

नागपूरवर दहा वर्षात धूलिकणांचे संकट

Next

निशांत वानखेडे

नागपूर : हवेतील प्रदूषणाकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाचे परिणाम हळूहळू वाढायला लागले आहेत. वाढती वाहतूक व औद्योगिकरणामुळे धूलिकण हे नागपूरकरांच्या चिंतेचे कारण ठरले आहे. गेल्या १०-१५ वर्षात हे संकट अधिकच गहिरे झाले आहे. यावर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर पुढे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी चिंता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर सादरीत प्रदूषणाच्या आकडेवारीने ही चिंताजनक बाब मांडली आहे. नागपूरच्या पाच स्टेशनवरून गोळा केलेली आकडेवारी सादर केली आहे. यामध्ये सध्याच्या काळात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन आक्साईड प्रदूषणाबाबत स्थिती समाधानकारक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र रिस्पायरेटरी सस्पेंडेड पार्टिकुलेट मॅटर (धूलिकण) मध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. २००४-०५ ते २००६-०७ पर्यंत सरासरी मर्यादा असलेल्या ६० मायक्रोग्रॅम/मीटरक्युबच्या आत असलेले धूलिकणांचे प्रमाण २००८-०९ पासून सातत्याने वाढलेले आहे. २०१०-११ ते २०१२-१३ या वर्षात ते १०० मा.ग्रॅम/मीक्युबच्या खाली राहिले होते. मात्र २००८-०९ ते २००९-१० व २०१३-१४ ते २०१९-२० पर्यंत १०० च्या वरच राहिले आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या पाचपैकी तीन निरीक्षण स्टेशनवर ही परिस्थिती आहे. यामध्ये उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा व शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर येथे त्यात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२० या काळात लॉकडाऊनमुळे धुलीकणांचे प्रदूषण कमालीचे घटले पण अनलॉकच्या पाच महिन्यात स्थिती पूर्ववत होत आहे.

ओझाेन व बेंझीनच्या प्रदूषणाचा विळखा

कॉर्बन मोनाक्साईडसह ओझोन व बेंझीनच्या प्रदूषणानेही शहरावरचे संकट वाढवले आहे. घुग्गुस व चंद्रपूरसह नागपूरमध्येही हे दाेन्ही घटकाचे प्रदूषण वाढत आहे. ओझाेन स्तर १०० मा.ग्रॅम/मी.क्युबच्या खाली असायला हवा, मात्र एमपीसीबीच्या आकडेवारीत हे प्रमाण मर्यादेबाहेर गेले आहे. याशिवाय बेंझीनचे प्रमाण ५ मा.ग्रॅम/मी.क्युबच्या वर तर काॅर्बन माेनाक्साईडचे प्रमाणही १० मा.ग्रॅम/मी.क्युबच्या पुढे गेल्याने सीपीसीबीने उपाययाेजना करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Dust crisis in Nagpur in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.