लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमच्या पुढाकाराने विविध संघटणांच्या सहकार्याने बुधवारी संविधान चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.धरणे आंदोलनानंतर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. या निवेदनात मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासोबतच ज्या शैक्षमिक संस्था यात सहकार्य करीत नाही, त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे, महाराष्ट्रात शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा ८ लक्ष करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अनुसूचित जातीच्या बजेटटची प्रभावी अंमलबजावणी करावी, आरक्षित पदांचा अनुशेष भरण्यात यावा, अॅट्रोसिटी कायद्यबाबत असलेला गैरसमज दूर करावा, याशिवाय स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात ई.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, पी.पी. वाटील, डॉ. जयराम खोब्रागडे, पी.आर. पुडके, राजरतन कुंभारे, मनोहर मेश्राम, विलास सुटे, अशोक गेडाम, धर्मेश फुसाटे, प्रा. मेहेंद्रकुमार मेश्राम, सिद्धार्थ हस्ते, किशोर चौधरी, मिलिंद बन्सोड, निर्गंनश: ठमके, व्ही.व्ही. मेश्राम, सच्चिदानं दारुंडे, डॉ. पूरण मेश्राम, डॉ. शरद माटे, एम.एम. आत्राम, आकाश मून, रेखा खोब्रागडे, शितल गणवीर, अतुल खोब्रागडे, नरेश मेश्राम, हंसराज भांगे, डॉ. गौतम कांबळे, साहेबराव सिरसाट, आर.एस. आंबुलकर, रामभाऊ बागडे, संघदीप उके आदींसह बानाई, डॉ. आंबेडकर अॅग्रोकोज असोसिएशन ऑफ इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंंट फेडरेशन, महाराष्ट्र युनिर्व्हसिटीज ऑफीसर्स फोरम, कस्ट्राईब कर्मचारी महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायजेशन, दी शेड्युल्ड कास्ट अॅण्ड बुद्धिस्ट पेंशनर्स, सामाजिक न्याय कर्मचारी संघटना, जागृत नागरिक मंच, बहुजन हिताय संघ, वंदना संघ दीक्षाभूमी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, समता सैनिक दल, मैत्रिणी, संजीवनी सखी मंच, मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, आम्रपाली महिला मंडळ, राष्ट्रीय परिवारिक धम्म संगोष्टी बौद्ध महिला मैत्री संघ, सम्यक संकल्प संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधानाच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात संघटनांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 9:41 PM
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमच्या पुढाकाराने विविध संघटणांच्या सहकार्याने बुधवारी संविधान चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
ठळक मुद्देलाक्षणिक धरणे आंदोलन : शिष्यवृत्ती , अनुशेषासह मागासवर्गीयांच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष