११७ अतिक्रमणांचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:57+5:302021-04-08T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने बुधवारी शहराच्या विविध भागात अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवून ११७ अतिक्रमणांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने बुधवारी शहराच्या विविध भागात अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवून ११७ अतिक्रमणांचा सफाया केला.
लक्ष्मीनगर झोनच्या प्रतापनगर रोड ते त्रिमूर्ती चौक ते जयताळा रोडच्या बाजूला असलेल्या चहाटपऱ्या, फळ व भाजीविक्रेत्यांची दुकाने हटविली. पथकाने २६ अतिक्रमणे हटविली.
हनुमानगर झोनच्या पथकाने तुकडोजी पुतळा चौक ते क्रीडा चौक, रेशीमबाग चौक ते तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा चौक ते ओमकार नगर चौक ते शताब्दी चौक आदी भागांतील फुटपाथवरील ३१ अतिक्रमणांचा सफाया केला.
धंतोली झोनच्या पथकाने शुक्रवारी तलाव, कॉटन माकेंट ते डालडा फॅक्टरी परिसरातील ३४ अतिक्रमणे हटविली. मनीषनगर येथील बाजार हटविला.
नेहरूनगर झोनच्या पथकाने जगनाडे चौक ते भांडे प्लाट चौक ते शीतला माता मंदिर ते दिघोरी रोड ते शिवमंदिर या भागातील रस्त्याच्या बाजूची २६ अतिक्रमणे हटविली. मंगळवारी झोन पथकाने नारी येथील आठवडी बाजार बंद केला. तसेच परिसरातील अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे केले.