नागपूरच्या सीताबर्डी परिसरात ३३ दुकाने तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:33 PM2019-02-09T22:33:23+5:302019-02-09T22:35:56+5:30
सीताबर्डी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत संपताच शनिवारपासून पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शनिवारी ३३ दुकानांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. तीन पोकलँड, तीन जेसीबी आणि तीन टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईसाठी दुकानदारांनी नासुप्रला सहकार्य केले. कारवाईदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी कार्यस्थळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत संपताच शनिवारपासून पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शनिवारी ३३ दुकानांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. तीन पोकलँड, तीन जेसीबी आणि तीन टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईसाठी दुकानदारांनी नासुप्रला सहकार्य केले. कारवाईदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीताबर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी कार्यस्थळी उपस्थित होते.
मौजा सीताबर्डी येथील खसरा क्रमांक ३२० व ३१५ या नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील ३३ दुकानांना दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजी विभागीय कार्यालय (पश्चिम) तर्फे नोटीस देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई नागपूर सुधार प्रन्यासतर्फे करण्यात आली. तीन दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान परिसरातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने तीन दिवसाची मुदत देण्याची विनंती सभापती यांच्याकडे केली होती. त्यामुळे सभापती यांनी दिलेली मुदत संपताच, शनिवारी पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढेही काही दिवस कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत कार्यकारी अभियंता (पश्चिम) प्रमोद धनकर, कार्यकारी अभियंता (तांत्रिक) मनोज इटकेलवार, विभागीय अधिकारी (पश्चिम) पंकज आंभोरकर, सहायक अभियंता विवेक डफरे, सहायक अभियंता पी.आर. शहारे, स्थापत्य अभि. सहायक अजय वासनिक, विद्युत अभियंता विनायक झाडे, स्थापत्य अभि. सहायक नीलेश तिरपुडे आणि नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील उपस्थित होते.