अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:37 AM2019-03-15T00:37:56+5:302019-03-15T00:41:38+5:30

छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

By the end with fight Sambhaji took Swarajya : Nitin Bangude-Patil | अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

सन्मित्र सभेतर्फे आयोजित ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर व्याख्यान देताना सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील, शेजारी सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, मंगेश काशिकर, अरविंद गरुड

googlenewsNext
ठळक मुद्दे‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.
सन्मित्र सभा, नागपूरच्यावतीने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश काशीकर होते. व्यासपीठावर सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, अरविंद गरुड उपस्थित होते. प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कामाचे नियोजन महत्त्वाचे असून नियोजनाद्वारेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मातृछत्र हरविल्यानंतर संभाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रात निपुण झाले. १६ भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाजी महाराजांनी हवा तसा आपला पुत्र घडविला. साडेआठ वर्षांचे असताना संभाजींचा राजकारणात प्रवेश झाला. आग्रा येथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटताना संभाजींनी शिवाजी महाराजांना तुमची स्वराज्याला गरज आहे, तुम्ही पुढे जा, असे सांगून आपल्या राष्ट्रधर्माचा परिचय दिला. पुढे संभाजी महाराज खटल्यांचा निकाल देऊ लागले. दान प्रमुख करून शिवाजी महाराजांनी त्यांना दानाचे महत्त्व शिकविले. संभाजी महाराजांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांच्या आयुष्यात राणी येसुबाई शिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती. परंतु चुकीचा इतिहास रंगवून त्यांना नाटक, चित्रपटातून बदनाम करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजींवर दिलेरखानाला जाऊन मिळाल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात शिवाजींनीच त्यांना राष्ट्रहितासाठी दिलेरखानाकडे पाठविले. संभाजी पन्हाळ्यात कैदेत होते, असा आरोप होतो. परंतु ते कधीही कैदेत नव्हते.
राजारामच्या लग्नाला न येण्यामागे ते बुऱ्हाणपुराच्या लढाईत व्यस्त असल्याचे कारण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य ताब्यात घेऊ अशी औरंगजेबाची भूमिका होती. परंतु संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत त्याला स्वराज्यात प्रवेश करू दिला नाही. एकटा रामशेज किल्ला घेण्यासाठी पाच वर्षे झुंजवत ठेवले. गोवा, तामिळनाडु, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार अशा नऊ राज्यांवर भगवा फडकवून अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय घटाटे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय मोडक यांनी सन्मित्र सभेची प्रार्थना म्हटली. सोमलवार निकालसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. आभार अरविंद गरुड यांनी मानले.

Web Title: By the end with fight Sambhaji took Swarajya : Nitin Bangude-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.