‘पोर्टल’मधील नोंदीने बिघडविले कोरोनाचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:26 PM2021-07-31T23:26:33+5:302021-07-31T23:26:57+5:30
'portal' mistaken Corona's count जुलै महिन्यात ५२७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना ‘आयसीएमआर’ व ‘कोविड-१९’ या पोर्टलमधील नोंदींच्या गोंधळामुळे जुलै महिन्यात एकाच दिवशी १५,३०६ रुग्ण व १,०७६ मृत्यूंची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात ५२७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना ‘आयसीएमआर’ व ‘कोविड-१९’ या पोर्टलमधील नोंदींच्या गोंधळामुळे जुलै महिन्यात एकाच दिवशी १५,३०६ रुग्ण व १,०७६ मृत्यूंची भर पडली. यामुळे कोरोनाचा आकड्याचे गणितच बिघडले. रुग्णांची संख्या वाढून १५,८३३, तर मृतांची संख्या १,०९१ वर पोहोचली.
नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यांच्या तुलनेत सर्वांत कमी रुग्ण व मृत्यूची नोंद जुलै महिन्यात झाली. जानेवारीमध्ये १०,५०७, फेब्रुवारीमध्ये १५,५१४, मार्चमध्ये ७६,२५०, एप्रिलमध्ये १,८१,७४९, मेमध्ये ६६,८१८ तर जूनमध्ये २,४४७ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक, २२९० मृत्यूंची नोंद एप्रिल महिन्यात झाली. जुलै महिन्यात २,१३,४८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचा दर ७.४१ होता; परंतु ‘पोर्टल’मध्ये अचानक वाढलेले आकडे काढल्यास हाच दर ०.२४ टक्के येतो.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती
महिना : तपासलेले नमुने : रुग्ण : मृत्यू : पॉझिटिव्हिटीचा दर
फेब्रुवारी : १,८१,४३५ : १५,५१४ : १७७ : ८.५५ टक्के
मार्च : ३,७९,१४३ :७६,२५० : ७६३ : २०.११ टक्के
एप्रिल : ६,५१,६३८ : १,८१,७४९ :२२९० : २७.८९ टक्के
मे : ५,२४,२२६ : ६६,८१८ : १५१४ : १२.७४ टक्के
जून : २,६६,८६१ :२,४४७ : १२३ : ०.९१ टक्के
जुलै : २,१३,४८४ : १५,८३३ : १०९१ : ७.४१ टक्के